ट्रम्प यांचे 4 कॉल, मोदींनी एकही फोन उचलला नाही; जर्मन वृत्तपत्राचा स्फोटक दावा- भारत झुकणार नाही, अमेरिकेची जगासमोर फजिती
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Narendra Modi not Pick Donald Trump Call: डोनाल्ड ट्रम्प यांनी चारदा फोन करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रतिसाद दिला नाही. अमेरिकन दबावाला झुगारत भारताने टॅरिफ विवादात कणखर भूमिका घेतली आहे.
वॉशिंग्टन/ नवी दिल्ली: डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन दबावासमोर झुकण्यास नकार दिला. याच दरम्यान जर्मनीच्या प्रतिष्ठित फ्रँकफर्टर आलगेमाइने साइटुंग (FAZ) या वृत्तपत्राने आपल्या वृत्तात असा दावा केला आहे की- डोनाल्ड ट्रम्प यांचा फोन घेण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नकार दिला आहे.
advertisement
डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत टॅरिफ वादात त्यांच्या सर्व विरोधकांचा पराभव केला आहे. पण भारताच्या बाबतीत त्यांची रणनीती तितकी प्रभावी ठरली नाही. FAZच्या वृत्ताचे शीर्षक होते – “Trump calls, but Modi doesn’t answer” म्हणजेच ट्रम्प कॉल करतात, पण मोदी उत्तर देत नाहीत.
advertisement
पंतप्रधान मोदींना 4 वेळा कॉल
जर्मनीच्या वृत्तपत्राने दावा केला की, डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात चार वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलण्याचा प्रयत्न केला. मात्र हे कॉल कधी आणि कोणत्या तारखांना करण्यात आले याबाबत तपशील दिला नाही. या वृत्तावर भारत आणि अमेरिका या दोन्हीकडून कोणताही औपचारिक प्रतिसाद आलेला नाही. ट्रम्प प्रशासनाने मागील काही महिन्यांत चीन, कॅनडा, मेक्सिको आणि युरोपियन युनियनसारख्या मोठ्या व्यापारी भागीदारांवर कठोर शुल्क लावले होते. या सर्व देशांनी किंवा तर समजुतीने मार्ग काढला किंवा अंशतः मागे हटले. पण भारताने वेगळा मार्ग स्वीकारला.
advertisement
ट्रम्पच्या दबावाखाली भारत झुकणार नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकन दबाव असूनही आयात शुल्क कमी करणे किंवा व्यापारी सवलती देणे यास स्पष्ट नकार दिला. FAZ लिहिते की, ट्रम्प यांची शैली नेहमीच संघर्षात्मक राहिली आहे. ते पुन्हा पुन्हा संवादाऐवजी धमकी किंवा दबावाची भाषा वापरतात. बहुतांश देशांनी अमेरिकन दबाव लक्षात घेऊन काहीतरी तोडगा काढला. मात्र भारताच्या बाबतीत गोष्ट वेगळी आहे. मोदी सरकारने देशांतर्गत उद्योग आणि शेतकऱ्यांच्या हितांना प्राधान्य दिले आणि ट्रम्प यांचे फोन कॉल तसेच इशारे दुर्लक्षित केले.
advertisement
अमेरिकेला भारताची गरज
FAZच्या वृत्तानुसार भारताची ही रणनीती दक्षिण आशियातील त्याची राजकीय ताकदही दाखवते. पंतप्रधान मोदी जाणून आहेत की आशियामध्ये चीनच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेला भारताची गरज आहे. त्यामुळे भारत व्यापारी आघाडीवर अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास बाध्य नाही. वृत्तपत्राने हे देखील लिहिले आहे की- मोदी सरकारचा हा दृष्टिकोन जागतिक राजकारणातील एका नव्या आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. भारताने आता स्वतःला “विकसित देशांच्या दबावाखाली येणारा” या पारंपरिक दर्जातून बाहेर काढले आहे. तो केवळ अमेरिकेशीच नव्हे तर युरोपियन युनियन आणि आशियाई देशांसोबतही संतुलित आणि मजबूत भागीदारी करत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 26, 2025 8:43 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
ट्रम्प यांचे 4 कॉल, मोदींनी एकही फोन उचलला नाही; जर्मन वृत्तपत्राचा स्फोटक दावा- भारत झुकणार नाही, अमेरिकेची जगासमोर फजिती


