Israel Iran War: इराणने उडवली झोप, 100 मिसाइलने डागले, तेल अवीव ते हाइफापर्यंत एका क्षणात सारं उद्ध्वस्त, पाहा थरारक VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
इराण-इस्रायल संघर्ष तीव्र होत असून, इराणने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-III अंतर्गत इस्रायलवर 100 हून अधिक मिसाइल्स आणि ड्रोन हल्ले केले. हायफामधील ऑईल रिफायनरी आणि पॉवर प्लांट उद्ध्वस्त झाले.
इराण इस्रायल संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. संघर्ष नव्या टप्प्यात दाखल झाला असून, शनिवारी रात्री इराणने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस-III अंतर्गत इस्रायलवर एकाच वेळी 100 हून अधिक बॅलिस्टिक मिसाइल्स आणि ड्रोनचा वर्षाव केला. इस्लामिक रिवोल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) मार्फत करण्यात आलेल्या या हल्ल्यांमुळे तेल अवीव, हायफा, यरुशलम आणि बेन गुरियन विमानतळ परिसरात मोठा धक्का बसला शिवाय नुकसानही झालं.
हायफामधील ऑईल रिफायनरी आणि पॉवर प्लांट या मिसाइल हल्ल्यांमुळे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाले. सोशल मीडियावर या हल्ल्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये मिसाइलच्या स्फोटानंतर मोठ्या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ उठताना दिसत आहेत. हायफानजिकच्याच तमरा या अरब बहुल शहरामध्ये एक दोन मजली इमारत मिसाइलमुळे कोसळली असून, यात 1 नागरिकाचा मृत्यू आणि 13 जण जखमी झाले आहेत.
advertisement
इस्रायल लष्कराच्या रेडिओने दिलेल्या माहितीनुसार, तेल अवीवच्या अनेक भागांमध्ये मिसाइल हल्ला करण्यात आला. एका इमारतीवर थेट प्रहार झाल्याची माहिती आहे. पश्चिम यरुशलम आणि बेन गुरियन विमानतळाजवळही भीषण स्फोट झाले. स्थानिक मीडिया अहवालानुसार, या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला असून 499 जखमी आहेत. इराणच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. तेहरानमधील इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांनाच टार्गेट केलं.
advertisement
The moment the power station in Haifa was hit...
pic.twitter.com/vU2kBNQLzA
— Yemen Military 🇾🇪 (@Yemenimilitary) June 16, 2025
Iran Attack on Israel latest video #Israel #IsraeliranWar #israil #iranisraelwar #IranIsraelConflict pic.twitter.com/UK9TtWoedO
— Indian Observer (@ag_Journalist) June 16, 2025
advertisement
ईरानी मिसाइल इजरायल की ओर बढ़ते हुए#IsraelIranTensions #MiddleEastConflict #IranStrikes #IsraeliArmy #NuclearThreat #DefenseFootage #UnverifiedVideo #Geopolitics #TehranTensions pic.twitter.com/NBS4BANpZ3
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) June 16, 2025
advertisement
इराणचा हेतू जगासमोर आला आहे. त्यामुळे आमच्याकडे या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नाही. हे संपूर्ण जगासाठी धोक्याचं आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही हा हल्ला केल्याचा दावा इराणने केला आहे. या दोघांच्या संघर्षाचे परिणाम जागतिक मार्केटवरुन दिसून येत आहेत. चांदी 6000 रुपयांनी घसरली असून सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. क्रूड ऑइल महाग होण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 16, 2025 9:37 AM IST
मराठी बातम्या/विदेश/
Israel Iran War: इराणने उडवली झोप, 100 मिसाइलने डागले, तेल अवीव ते हाइफापर्यंत एका क्षणात सारं उद्ध्वस्त, पाहा थरारक VIDEO


