Israel Iran War :इराण-इस्त्रायलमधील संघर्ष वाढला, हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये रेड अलर्ट

Last Updated:

इराणच्या सैन्यानं इस्त्रायलवर शेकडो बॅलेस्टीक मिसाईल आणि ड्रोनचा डागलेत.

News18
News18
Israel Iran War :  इस्त्रायल आणि इराणमध्ये युद्ध पेटलं आहे. .इस्त्रायलनं केलेल्या हल्ल्याला इराणनं जोरदार प्रत्युत्तर देत जवळपास 200 बॅलेस्टीक मिसाईल इस्त्र्यालच्या अनेक शहरांवर डागली आहे.या दोन्ही देशातील या वाढत्या तणावावर जगभरात चिंतेंचं वातावरण आहे. इराणच्या हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आलाय..होम फ्रंड कमांडने इस्त्रायलमध्ये मोठ्या हल्ल्याचा इशारा दिला आहे.स्थानिक नागरिकांना सुरक्षत स्थळी जाण्याचं आणि बंकरमध्ये लपण्याचं आवाहन करण्यात आलंय...
इस्त्रायलची राजधानी तेल अवीवमध्ये अनेक भागात हल्ल्यानंतर सायरनचा आवाज घुमू लागला आहे. इस्त्रायलनं इराणवर हल्ला करताना मिसाईल्सचा अक्षरश पाऊस पाडला. .इस्त्रायलच्या या हल्ल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाई इस्त्रायलवर जवळपास 200 बॅलेस्टीक मिसाईल डागलीत.इराणने केलेल्या या हल्ल्यात इस्त्रायलचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा
दावा केला जात आहे.

लाखो इस्त्रायली नागरिकांनी बंकरमध्ये आश्रय

advertisement
इराणने केलेल्या बॅलेस्टीक मिसाईलच्या हल्ल्यानतंर सेंट्रल इस्त्रायलमधील अनेक घराचं नुकसान झालंय. या हल्ल्यात 50 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याचं बोललं जातंय. इ्स्त्रायली सैन्य दल म्हणजे IDFच्या दाव्यानुसार इराणनं केलेल्या मिसाईल हल्ल्यानतंर
संपूर्ण इस्त्रायलमध्ये सायरन वाजू लागले. त्यामुळं लाखो इस्त्रायली नागरिकांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. इराणच्या सैन्यानं इस्त्रायलवर शेकडो बॅलेस्टीक मिसाईल आणि ड्रोनचा डागलेत.
advertisement

पलटवारासाठी सैन्य सज्ज

इस्त्रायलचं ऑपरेशन रायझिंग लायनच्या जबाब देण्यासाठी इराणने ऑपरेशन प्रॉमिस सुरू केलंय...इराणच्या रिवोल्यूशनरी गार्डनने इस्त्रायलच्या अनेक ठिकाणी हल्ल्याची पृष्टी केलीय. या हल्यात अनेक नागरिक जखमी झाल्याची खबर आहे. दरम्यान इराणने डागलेल्या क्षेपणास्त्रांपैकी अनेक क्षेपणास्त्रांना इंटरसेफ्ट केल्याचा दावा इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी केला आहे. इराणवर मोठ्या पलटवारासाठी सैन्य सज्ज असल्याचा इशारा इस्रायलनं दिलाय.. इस्त्रायली नागरिकांनी बंकरमध्ये राहण्याचे तसेच होम फ्रंट कमांडच्या निर्देशांचं पालन करण्याचं आव्हान इस्रायलनं केलंय.
advertisement

सोशल मीडियावर व्हायरल

एकूणच इस्रालय आणि इराण या दोन देशात भयंकर युद्धाला तोंड फुटलंय. इस्त्रालयाच्या हल्ल्यानं इराण बिथरलाय.या युद्धात जो कोणता देश इस्त्रायलचा साथ देईल तो त्याला आपला दुश्मन मानू असं इराणनं स्पष्ट केलंय. इराणचं हे वक्तव्य म्हणजे सरळसरळ अमेरिकेला धमकी असल्याचं मानलं जात आहे. याच दरम्यान, इस्त्रायली लढाऊ विमानांनी पुन्हा एकदा इराणवर हल्ले सुरू केलेत.सलग दुसऱ्या दिवशी इराणची राजधान तेहरानला इस्त्रालयनं लक्ष्य केलं. सोशल मीडियावर व्हायरल व्हिडीओत
advertisement
तेहरानचं मेहराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ आगीच्या ज्वालांनी घेरलेलं दिसलं.या विमानतळाच्या आजूबाजूचा परिसरात धुराचे लोट दिसून आलेत...
याचवेळी दुसऱ्या बाजूला इराणच्या हल्ल्यानंतर इस्रत्रायलची राजधानी तेल अवीव आणि जेरूसलेम शहरात सातत्यानं सायरन वाजत आहेत. इराणचे हल्ले रोखण्याचं काम एअर डिफेन्स सिस्टीम करत असल्याचं इस्रायली सैन्यानं म्हटलंय. जनतेनं सुरक्षित ठिकाणी
आश्रय घ्यावा असं आवाहन इस्त्रायली सैन्याकडून केलं जातंय. एकूणच इराण आणि इस्त्रायल दरम्यानचं हे युद्ध दिवसेदिवस भीषण होत चाललंय.
view comments
मराठी बातम्या/विदेश/
 Israel Iran War :इराण-इस्त्रायलमधील संघर्ष वाढला, हल्ल्यानंतर इस्त्रायलमध्ये रेड अलर्ट
Next Article
advertisement
Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement