विवाहित प्रियकराला हॉटेलच्या खोलीत घेऊन गेली, रात्रीच्या अफेअरनंतर घडले शॉकिंग; कोर्टाचा धडकी भरवणारा आदेश
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Extramarital Affair: चीनमधील एका विवाहित पुरुषाचा हॉटेल रूममध्ये प्रियसीसोबतच्या शारीरिक संबंधादरम्यान मृत्यू झाला. कोर्टाने या प्रकरणी प्रियसीला लाखोंची नुकसानभरपाई भरण्याचा धक्कादायक आदेश दिला.
बीजिंग: एका महिलेला तिच्या विवाहित प्रियकराच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला सुमारे 7.5 लाख इतकी भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या खळबळजनक घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. चीनमधील एका न्यायालयाने एका महिलेला तिच्या विवाहित प्रियकराच्या कुटुंबाला 62,000 युआन (भारतीय चलनात 7,53,643.48) भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. या व्यक्तीचा एका हॉटेलच्या खोलीत लैंगिक संबंध ठेवल्यानंतर मृत्यू झाला होता.
रेड स्टार न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार 66 वर्षीय झोउ नावाच्या व्यक्तीचा स्थानिक रुग्णालयाने दिलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रात 'अक्यूट मायोकार्डियल इन्फेक्शन' (Acute Myocardial Infarction) म्हणजेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचे नमूद केले होते. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार 14 जुलै 2024 रोजी चीनच्या दक्षिणेकडील ग्वांगशी झुआंग स्वायत्त प्रदेशातील पिंगनान काउंटी येथील एका हॉटेलमध्ये झोउने त्याची प्रेयसी झुआंग हिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. या घटनेच्या काही तासांनंतरच त्याचा मृत्यू झाला.
advertisement
झोउची पत्नी आणि मुलाने झोउला वाचवण्यात अपयशी ठरल्याबद्दल हॉटेल आणि झुआंग यांच्यावर खटला दाखल केला होता. त्यांनी 5.5 लाख रुपयांची मागणी केली होती. ज्यात न्यायालयाने अंत्यसंस्कारासाठी 70,000 जोडले. ज्यामुळे एकूण रक्कम 6.2 लाख झाली. त्यानंतर न्यायालयाने अंतिम निर्णय दिला.
झोउ आणि झुआंग यांनी 1980 च्या दशकात एका कारखान्यात एकत्र काम केले होते आणि 2023 मध्ये एका पार्टीत त्यांची पुन्हा भेट झाली. 14 जुलै 2024 रोजी झोउ हॉटेलमध्ये झुआंगला त्याच्यासोबत येण्यासाठी बोलावले. झुआंगच्या म्हणण्यांनुसार लैंगिक संबंध ठेवल्यानंतर दोघेही झोपी गेले.
advertisement
झोपेतून उठल्यावर झुआंगला आढळले की झोउ श्वास घेत नव्हता. झोउचा मृत्यू झाला आहे असे वाटून ती घाबरली आणि तिला काय करावे हे सुचले नाही. झुआंगला स्वतःला उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याने ती आधी घरी जाऊन रक्तदाब कमी करण्याच्या गोळ्या घेण्यासाठी गेली. सुमारे एक तासानंतर ती हॉटेलमध्ये परतली आणि तिला रूम उघडता न आल्यामुळे तिने हॉटेल कर्मचाऱ्याची मदत घेतली. खोलीत शिरल्यावर त्यांनी झोउला हाक मारली, पण त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. हॉटेल कर्मचाऱ्याने रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावले. नंतर डॉक्टर आणि पोलिसांनी झोउचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
advertisement
पोलिसांना तपासामध्ये असेही आढळले की, झोउला स्वतःला उच्च रक्तदाबाचा त्रास होता आणि त्याला यापूर्वी हृदयविकाराचा झटकाही आला होता.
न्यायालयाने असे सांगितले की, झोउचा मृत्यू त्याच्या आधीपासून असलेल्या आजारांमुळे झाला होता. त्यामुळे याची मुख्य जबाबदारी त्याचीच होती. झुआंगला झोउच्या आधीच्या आजारांबद्दल माहिती नसल्यामुळे तिला केवळ दुय्यम जबाबदारी (secondary responsibility) साठी दोषी ठरवण्यात आले.
advertisement
न्यायालयाने म्हटले की झुआंगने खोली सोडून एक तासानंतर परत येण्यामुळे त्याला वाचवण्याची उत्तम संधी गमावली. याशिवाय झोउ विवाहित असल्याचे माहीत असूनही त्याच्यासोबत संबंध ठेवल्याने तिने सार्वजनिक सुव्यवस्था आणि चांगल्या चालीरीतींचे उल्लंघन केल्याचेही न्यायालयाने म्हटले. शेवटी न्यायालयाने झुआंगने कुटुंबाला मागितलेल्या एकूण 6.2 लाख रुपयांपैकी 10% रक्कम भरपाई म्हणून देण्याचे आदेश दिले. हॉटेलमध्ये त्याचा मृत्यू झाला असल्याने आणि ती सार्वजनिक जागा नसल्याने हॉटेलची कोणतीही चूक नाही आणि त्यांना कोणतीही भरपाई देण्याची आवश्यकता नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 23, 2025 8:53 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
विवाहित प्रियकराला हॉटेलच्या खोलीत घेऊन गेली, रात्रीच्या अफेअरनंतर घडले शॉकिंग; कोर्टाचा धडकी भरवणारा आदेश


