25 हजार लोकांना ठार केले, हजारो बेपत्ता; मोदीजी, खूप छळ सुरू आहे, Please मदत करा

Last Updated:

Muhajirs In Pakistan: पाकिस्तानच्या मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (MQM) या राजकीय पक्षाचे निर्वासित संस्थापक अल्ताफ हुसैन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात स्थायिक झालेल्या मुहाजिरांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचांवर उचलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

News18
News18
कराची: मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट (MQM) या राजकीय पक्षाचे निर्वासित संस्थापक अल्ताफ हुसैन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदतीची याचना केली आहे. एका सोशल मीडिया पोस्टद्वारे हुसैन यांनी मुहाजिरांवर होणाऱ्या अत्याचाराचा मुद्दा आंतरराष्ट्रीय मंचांवर उचलण्याचे आवाहन केले आहे. हुसैन यांच्या या आवाहनाचे केंद्रबिंदू 'मुहाजिर' आहेत. जे फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात स्थायिक झालेले उर्दू भाषिक स्थलांतरित आहेत. अल्ताफ हुसैन यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, फाळणीनंतर मुहाजिरांना कधीही पाकिस्तानचे कायदेशीर नागरिक म्हणून स्वीकारले गेले नाही.
हुसैन यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, "MQM सातत्याने उपेक्षित समुदायांच्या हक्कांसाठी लढत आहे. तिला पाकिस्तानी सैन्याच्या छळाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्या मते, या लष्करी कारवाईत 25,000 हून अधिक मुहाजिरांचा मृत्यू झाला असून, हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. ते खूप छळ सहन करत असून आता त्यांना वाचवण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
advertisement
फाळणीमुळे झालेले स्थलांतर
1947 मध्ये भारताच्या फाळणीनंतर इतिहासातील सर्वात मोठे स्थलांतर झाले. भारतातील हिंदू बहुल शहरे आणि वस्त्यांतून सुमारे 20 लाख मुस्लिम पाकिस्तानात गेले. भारत आणि पाकिस्तान सरकारांमधील 1951 च्या करारामार्फत या स्थलांतराला कायदेशीर मान्यता मिळाली. ज्याला 1951 च्या पाकिस्तानी नागरिकत्व कायद्याने आणखी बळ दिले. या कायद्यानुसार भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानात प्रवेश करणाऱ्या सर्व स्थलांतरितांना तत्काळ पाकिस्तानी नागरिक म्हणून मान्यता देण्यात आली. साधारणपणे भारताच्या पूर्वेकडील प्रदेशांतील मुस्लिम पूर्व पाकिस्तानात (आताचे बांगलादेश) स्थलांतरित झाले. जिथे भाषिक आणि सांस्कृतिक समानतेमुळे त्यांना स्थायिक होण्यास मदत झाली.
advertisement
मुहाजिर कोण आहेत?
याउलट पश्चिम सीमेवरून दोन महत्त्वपूर्ण वांशिक गट पश्चिम पाकिस्तानात गेले. पहिल्या गटात पूर्व पंजाबमधील पंजाबी भाषिक स्थलांतरित होते. जे समान वांशिक, भाषिक आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांमुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात सहज मिसळून गेले. दुसऱ्या गटात उत्तर, मध्य आणि उच्च भारतातील शहरे आणि वस्त्यांमधून आलेले उर्दू आणि हिंदी भाषिक स्थलांतरित होते. अरबी भाषेत मुहाजिर शब्दाचा अर्थ 'स्थलांतरित' असा होतो. हा शब्द सामान्यतः फाळणीनंतर भारतातून पाकिस्तानात गेलेल्या उर्दू भाषिक मुस्लिमांसाठी वापरला जातो. यापैकी बहुतेक स्थलांतरित कराची, हैदराबाद, सक्खर आणि मीरपूरखाससारख्या सिंधमधील शहरे आणि वस्त्यांमध्ये स्थायिक झाले. सिंधची राजधानी कराचीमध्ये मुहाजिर बहुसंख्य झाले.
advertisement
'पन्हागीर', 'भगोरे' आणि 'हिंदुस्तानी'
सिंधमध्ये मुहाजिरांना अजूनही पाकिस्तानी किंवा सिंधी म्हणून पूर्णपणे स्वीकारले जात नाही. अगदी पाकिस्तानात जन्मलेले आणि वाढलेले दुसऱ्या आणि तिसऱ्या पिढीचे मुहाजिरही अपमानजनकपणे 'पनाहगीर' (शरणार्थी), 'भगोरे' (पळपुटे), 'भैया' आणि 'हिंदुस्तानी' म्हणून संबोधले जातात. माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो आणि बेनझीर भुट्टो यांच्यासह प्रमुख राजकीय व्यक्तींनी त्यांना 'हिंदुस्तानी' ठरवले. ज्यामुळे त्यांच्यावरील परकेपणाचा शिक्का अधिक मजबूत झाला.
advertisement
भेदभावाला सामोरे
मुहाजिरांना गंभीर संस्थात्मक भेदभावाला सामोरे जावे लागते, विशेषतः शिक्षण आणि रोजगाराच्या बाबतीत. कोटा प्रणाली लागू झाल्याने त्यांच्यासाठी उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांची दारे प्रभावीपणे बंद झाली आहेत. परिणामी मुहाजिर स्वतःला उपेक्षित मानतात, समान हक्कांसाठी संघर्ष करतात आणि जेव्हा ते योग्य वागणुकीची मागणी करतात तेव्हा त्यांना अनेकदा देशद्रोही म्हणून पाहिले जाते.
advertisement
अनिश्चित भविष्य  
पाकिस्तानमधील बिघडलेल्या सामाजिक-आर्थिक परिस्थितीमुळे, मुहाजिरांचे भविष्य अनिश्चित आहे. पाकिस्तानने 1971 मध्ये बांगलादेशच्या निर्मितीसह आधीच एक फाळणी अनुभवली आहे. त्याच पद्धतीचा भेदभाव, ज्यामुळे त्या फाळणीला कारण मिळाले, तो आजही कायम आहे. पूर्वीच्या पूर्व पाकिस्तानच्या बंगाली लोकसंख्येलाही अशाच प्रकारच्या राजकीय आणि आर्थिक दडपशाहीचा सामना करावा लागला होता. ज्यामुळे शेवटी त्यांच्या स्वातंत्र्याची मागणी उदयास आली.
advertisement
बरेच मुहाजिर आपल्या पूर्वजांच्या भूमीला, भारताला, भेट देण्यासाठी उत्सुक आहेत. त्यांना आपल्या मूळांशी पुन्हा जोडले जायचे आहे. आपल्या वडिलोपार्जित घरांना पाहायचे आहे. आपल्या पूर्वजांच्या कबरींना भेट द्यायची आहे आणि आपल्या विस्तारित कुटुंबाला पुन्हा भेटायचे आहे. मात्र भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांवर कठोर व्हिसा निर्बंध लादले आहेत. ज्यात इतर देशांमध्ये राहणारे पाकिस्तानी वंशाचे लोक देखील भारताच्या या कठोरतेचा बळी ठरतात.
मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंट
या संघटनेची स्थापना 1978 मध्ये अल्ताफ हुसैन यांनी ऑल पाकिस्तान मुहाजिर स्टुडंट ऑर्गनायझेशन (APMSO) या विद्यार्थी संघटनेच्या रूपात केली होती. 1984 मध्ये ती एक पूर्ण राजकीय पक्ष बनली. मुत्ताहिदा कौमी मूव्हमेंटने लवकरच सत्ता मिळवली आणि कराचीवर पूर्णपणे नियंत्रण प्रस्थापित केले. 2004 मध्ये अल्ताफ हुसैन यांनी आपल्या पक्षाचे ध्येय वर्णन करताना म्हटले होते की, आपले तात्काळ राजकीय उद्दिष्ट पाकिस्तानची भ्रष्ट मध्ययुगीन सरंजामशाही राजकीय व्यवस्था बदलणे आहे. आपण खालच्या आणि मध्यम वर्गाचा एकमेव खरा पक्ष आहोत. पक्षाने कराचीमध्ये महत्त्वपूर्ण ताकद मिळवली आणि शेवटी पाकिस्तानमधील तिसरा सर्वात मोठा पक्ष बनला. त्याने अनेक आघाडी सरकारांमध्ये भागीदाराची भूमिका बजावली.
MQM चे रक्तरंजित दमन
मुहाजिरांच्या वाढत्या प्रभावामुळे राजकीय अभिजात वर्ग आणि विशेषतः लष्करी प्रभावाला धोका निर्माण झाला. 1990 मध्ये पाकिस्तानी सैन्याने पक्का किल्ला ऑपरेशन राबवले, ज्याच्या परिणामी 250 निष्पाप पुरुष, महिला आणि मुलांचा मृत्यू झाला. 1992 ते 1994 पर्यंत पाकिस्तानी सैन्याने MQM विरुद्ध रक्तरंजित दमन केले आणि हजारो MQM कार्यकर्ते आणि समर्थक मारले गेले किंवा बेपत्ता झाले. 'ऑपरेशन क्लीन-अप' नावाच्या या मोहिमेला MQM ने विरोध केला. त्यामुळे राजकीय हिंसाचार भडकला आणि अराजकता पसरली. 1992 मध्ये हत्येच्या एका प्रकरणात समन्स मिळाल्यानंतर अल्ताफ हुसैन ब्रिटनला पळून गेले.
अल्ताफ हुसैन कोण आहेत?
अल्ताफ हुसैन यांचे आई-वडील उत्तर प्रदेशातील आग्रा येथील होते आणि फाळणीनंतर ते पाकिस्तानच्या सिंध प्रांतात स्थलांतरित झाले होते. हुसैन यांच्याकडे फार्मा पदवी होती. परंतु त्यांनी 1971 च्या बांगलादेश युद्धासह लष्करी सेवा देखील केली होती. जेव्हा हुसैन बांगलादेशातून परतले आणि नियमित सैन्यात सामील होऊ इच्छित होते. तेव्हा त्यांचे आई-वडील मुहाजिर असल्याने त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. जरी हुसैन यांनी आपला जन्म पाकिस्तानात झाल्याचे म्हटले होते. 1979 मध्ये हुसैन यांनी बांगलादेशात अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांच्या सुरक्षित परतीसाठी एका निदर्शनात भाग घेतला. त्यांना नऊ महिन्यांची तुरुंगवासाची आणि पाच फटक्यांची शिक्षा झाली. यानंतर बिघडलेल्या वांशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ते मुहाजिर समुदायाचे करिश्माई नेते म्हणून वेगाने उदयास आले. हुसैन स्वतःला एका छळलेल्या अल्पसंख्याक समुदायाचे प्रतिनिधी म्हणतात. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पाकिस्तानी सरकारने अटक केली, छळले आणि बेकायदेशीरपणे ठार केले.
मराठी बातम्या/विदेश/
25 हजार लोकांना ठार केले, हजारो बेपत्ता; मोदीजी, खूप छळ सुरू आहे, Please मदत करा
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement