Nepal Former PM Wife: नेपाळमधून मोठी बातमी; माजी पंतप्रधानांच्या घराला पेटवलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Nepal Former Prime Minister: नेपाळमध्ये मोठी अनागोंदी माजली असून आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवली आहे. त्याचसोबत नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरातही आग लावण्यात आली.
काठमांडू : नेपाळमध्ये मोठी अनागोंदी माजली असून आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवली आहे. त्याचसोबत नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरातही आग लावण्यात आली. तसेच युवकांनी नेपाळच्या मंत्र्यांची घरांवरही हल्ला केला असून जिकडे तिकडे नुसता गोंधळ माजल्याचं दिसून येतंय. नेपाळमधील आंदोलनानंतर मंत्र्यांनी देश सोडायला सुरूवात केली आहे. आंदोलनला हिंसक वळण मिळाले आहे. आंदोलकांनी केलेल्या जाळपोळीत माजी पंतप्रधानाच्या पत्नी गंभीररीत्या भाजल्या आहेत.
नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई आक्रमक झाली. त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर मोर्चा नेला, अनेक ठिकाणी हिंसा झाली. आक्रमक झालेल्या तरूणाईने नेपाळचे माजी पंतप्रधान झालानाथ खनाल यांच्या घराला देखील आग लावली आणि या जाळपोळीत त्याच्या पत्नी रविलक्ष्मी भाजल्या आहेत. रविलक्ष्मी या प्रसिद्ध चित्रकार म्हणून देखील ओळखल्या जातात.
advertisement
झालनाथ खनल हे 2011 साली नेपाळचे पंतप्रधान
झालनाथ खनल हे 2011 साली नेपाळचे पंतप्रधान होते. नेपाळत्या राजकरणावर त्यांचा मोठा प्रभाव होता. मंगळवारी त्यांच्या दल्लू येथील घराला आंदोलकांनी पेटवलं, यामध्ये त्यांची पत्नी गंभीररीत्या भाजली गेली. खनल यांना नेपाळच्या सेनेने त्यांना रेस्क्यू केले आहे. सीपीएनचे नेता नरेश शाही यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांची पत्नी आपला मुलगा निर्भिक खनालसोबत घरी होते.
advertisement
नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य
नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावर निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई आक्रमक झाली. त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर मोर्चा नेला, अनेक ठिकाणी हिंसा झाली. त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली तरी आंदोलक मागे हटायला तयार नाहीत. नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा, पोलिस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या आंदोलकांनी केल्या आहेत. या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारात आग लावली. तसेच मंत्र्यांच्या घरांनाही आग लावली. त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे.
view commentsLocation :
Delhi
First Published :
September 09, 2025 7:27 PM IST


