Mayday...Mayday...Mayday विमानाचं भररस्त्यात क्रॅश लॅण्डिंग, अनेक गाड्यांना धडक, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असतानाच विमानाने क्रॅश लॅण्डिंग केलं. लँडिंग करताना विमानाचा उजवा पंख एका वाहनाला धडकल्याने मोठा अपघात झाला.
विचार करा गाडी चालवताना किंवा तुम्ही गाडीत बसलाय आणि अचानक रस्त्यावर मोठं वाहन आलं तर काय होईल याचा विचार न केलेला बरा, पण वाहन नाही तर प्रत्यक्षात विमानच समोर आलं अशी अवस्था झाली. गाड्यांची वर्दळ असलेल्या ट्रॅफिकच्या रस्त्यावर चक्क विमानाचं क्रॅश लॅण्डिंग झालं. यामुळे अपघात झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
जॉर्जियातील गेन्सविले इथे काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना समोर आली. हवेत असताना विमानाचे इंजिन निकामी झाल्यामुळे एका छोट्या विमानाला भररस्त्यात 'इमर्जन्सी लँडिंग' करावं लागलं. मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला दिलेला शेवटचा मेसेज ऐकून डोळ्यात पाणी येईल. मात्र, दैव बलवत्तर अन् या मोठ्या अपघातातून सर्वजण थोडक्यात बचावले.
नेमकं काय घडलं?
हे 'सिंगल इंजिन' विमान गेन्सविलेच्या विमानतळावरून निघालं होतं, हे एक ट्रेनिंग देण्यासाठी वापरलं जाणारं विमान असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र काही वेळातच इंजिनमध्ये बिघाड झाला. विमानाची उंची आणि शक्ती कमी होत असल्याचे पाहून वैमानिकाने 'मेडे, मेडे मेडे' कॉल दिला. विमानतळापर्यंत पोहोचणे अशक्य असल्याचं लक्षात येताच वैमानिकाने भर ररस्त्यात ब्राउन्स ब्रिज रोडवर विमान उतरवण्याचा धाडसी निर्णय घेतला.
advertisement
वैमानिकाचा शेवटचा निरोप
अपघातापूर्वी वैमानिकाला आपण वाचू की नाही, याची खात्री नव्हती. त्याने अत्यंत भावूक होत कंट्रोल रूमला सांगितले, "आम्ही पोहोचू शकणार नाही. प्लीज, माझ्या पत्नीला सांगा की माझं तिच्यावर खूप प्रेम आहे... आणि माझ्या आई-वडिलांनाही सांगा, मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो." वैमानिकाचा हा निरोप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
advertisement
#BREAKING : Video shows the moments a small plane on a training flight made an emergency crash landing on a busy street in Gainesville, Georgia.#Georgia #Gainesville #emergency #crash #landing #Plane #street pic.twitter.com/4XfzFDVFip
— mishikasingh (@mishika_singh) February 10, 2026
advertisement
भररस्त्यात गाड्यांना धडक
रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असतानाच विमानाने क्रॅश लॅण्डिंग केलं. लँडिंग करताना विमानाचा उजवा पंख एका वाहनाला धडकल्याने मोठा अपघात झाला. विमानाची इंधन टाकी एका एसयूव्हीमध्ये घुसली. सुदैवाने, या भीषण धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही नागरिक जखमी झाले.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
या घटनेचा व्हिडिओ सध्या जगभरात व्हायरल होत आहे. ज्या प्रकारे वैमानिकाने व्यस्त रस्त्यावर विमान उतरवले आणि मृत्यूला समोर पाहूनही आपल्या कुटुंबाची आठवण काढली, ते पाहून नेटकरी वैमानिकाच्या धाडसाचे कौतुक करत आहेत. फेडरल एविएशन एडमिनिस्ट्रेशन आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 10, 2026 12:58 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
Mayday...Mayday...Mayday विमानाचं भररस्त्यात क्रॅश लॅण्डिंग, अनेक गाड्यांना धडक, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO







