पोटदुखी मग झाली उलटी, व्यक्तीच्या पोटातून बाहेर आली धक्कादायक गोष्ट, पाहा Video
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
लोकांना अनेकदा वेगवेगळे आजार होत असतात मात्र त्या आजाराविषयी त्यांना बऱ्याचदा समजत नाही. कधी तर अनेक विचित्र घटना घडतात. एका व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार घडला.
नवी दिल्ली : लोकांना अनेकदा वेगवेगळे आजार होत असतात मात्र त्या आजाराविषयी त्यांना बऱ्याचदा समजत नाही. कधी तर अनेक विचित्र घटना घडतात. एका व्यक्तीसोबत धक्कादायक प्रकार घडला. व्यक्तीनं उलटी केली आणि त्या उलटीमधून एर धक्कादायर गोष्ट बाहेर पडली. ही घटना आणि त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे.
एका व्यक्तीच्या पोटात दुखत होतं. त्यानंतर काही वेळानं त्याला उलटी झाली आणि पोटातून एक किडा बाहेर पडला. हा किडा भरपूर मोठा होता. हे पाहून व्यक्ती घाबरला आणि हॉस्पिटलला पोहोचला. हे प्रकरण पाहून डॉक्टरही चक्रावले.
advertisement
समोर आलेलं हे प्रकरण खूपच विचित्र आणि धक्कादायक आहे. एका व्यक्तीचं पोट दुखत होतं. त्यानंतर तो एका मेडिकलमध्ये गेला आणि पोटदुखीची गोळी आणली. जेवणाच्या काही तासानंतर त्याला उलटी झाली. त्याच्या पोटातून जिवंत गांडूळ बाहेर पडलं. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये बेसिनमध्ये हा किडा वळवळताना दिसतोय.
@StarBede नावाच्या X अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यांनी त्यांच्याकडे आलेल्या पेशंटचा हा किस्सा सोशल मीडियावर शेअर केला. डॉक्टरने त्याला विचारलं की शेवटचे जंत कधी काढले होते तर पेशंटनं सांगितलं की बरेच वर्ष झाले.
advertisement
Yesterday,a patient walked into the pharmacy with complaints of abdominal pain and an urge to vomit . The pharmacist asked him when last he dewormed himself and said it’s been years . He was prescribed vermox to use . He took the medication last night and woke up this morning… pic.twitter.com/Ovkt2hjbqU
— Pharmacist Emeka (@StarBede) April 2, 2024
advertisement
दरम्यान, अशा अनेक धक्कादायक आणि वेगळ्या घटना घडत असतात. कोणासोबत कधी काय घडेल सांगू शकत नाही. असे काही ना काही घटना सतत सोशल मीडियावर समोर येत असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 04, 2024 5:01 PM IST