summer tips : घरात AC चालू, फॅन, लाईटही, मग बिल कसं कमी करायचं? सोप्पा फॉर्म्युला
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
देशभरात सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला आहे. उष्माघातानं मृत्यू झाल्याच्या घटनासुद्धा घडत आहेत. या उन्हाळ्याला तोंड देताना आपण हैराण होत असतो. अशा वेळी थंड हवा घरभर पसरवणारा एअर कंडिशनर आपल्याला दिलासा देतो
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एसीचा कंडेंसर हा नेहमी घराबाहेर बसवला जातो. विंडो एअर कंडिशनर किंवा स्प्लिट एअर कंडिशनर या दोन्ही बाबतीत हीच पद्धत वापरली जाते; पण यात धूळ साचून फिल्टर खराब होऊ शकतो. परिणामी तो पुरेसं काम करू शकत नाही आणि विजेचा जास्त वापर होतो. त्यामुळं विजेचा खर्च वाचवणं आणि घरातही शुद्ध हवा मिळणं, यासाठी एसीचा फिल्टर नियमित स्वच्छ करणं गरजेचं आहे. प्रत्येक ऋतूमध्ये एकदा तरी याचं सर्व्हिसिंग करून घेणं आवश्यक आहे.
advertisement
घरात हवा खेळती राहण्यासाठी तसंच एसीमधून होणाऱ्या कूलिंगचा वेग वाढवण्यासाठीसुद्धा घरातला सीलिंग फॅन तुम्ही चालू ठेवू शकता. यामुळं पूर्ण खोली एकसारखी गार होईल. हवेचा प्रवाह घरात चांगला राहील आणि खोलीचं तापमानसुद्धा नियंत्रित राहील. आपल्याला आरामदायी वाटण्यासाठी आणि अतिरिक्त हवा खेळती राहण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.
advertisement
घरातल्या एसीमधून येणारा गारवा आणि त्याची कार्यक्षमता कायम ठेवण्यासाठी नेहमी दरवाजे, खिडक्या पूर्ण बंद करून घ्या. खोलीतली गार हवा बाहेर जाणार नाही, याची काळजी घ्या. दरवाजा, खिडकी उघडी राहिल्यास एसीचा थंडावा बाहेर जाऊन विजेचं बिल जास्त येऊ शकतं. कारण बाहेरची हवा आत आल्यानं खोली गार ठेवण्यासाठी एसीमधली यंत्रणा अधिक काम करू लागते आणि परिणामी आपल्याला बिल जास्त येतं.
advertisement
advertisement