वकिलाची नुसती शायनिंग, कोर्टात म्हणतोय YA YA YA ; CJI चंद्रचूड संतापले, नक्की प्रकरण काय?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या याचिकेच्या सुनावणीदरम्यान माजी सरन्यायाधीश गोगोई यांचं नाव काढून टाकण्यात यावं असे आदेश सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्याला दिले.
मुंबई : सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड आणि त्यांचं बेंच सोमवारी न्यायदानासाठी आलं आणि एक एक करत याचिकांची सुनावणी सुरु झाली. या दरम्यान एक याचिका समोर आली आणि याचिकाकर्त्याच्या वकिलाने अनौपचारिक भाषेत काही प्रश्न उपस्थित केले. त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या बेंचने त्या वकिलाच्या भाषेवर ताशेरे ओढले. हे वकील महाशय ‘yes’ ऐवजी ‘ya’ असं म्हणत असल्यामुळे चंद्रचूड यांनी त्यांना सुनावलं.
भरकोर्टात सरन्यायाधीश चंद्रचूड त्या वकिलाला म्हणाले, 'yes म्हणा! ya ya ya म्हणू नका. हे कोर्ट आहे, कॉफी शॉप नाही! लोकांच्या yes म्हणण्याची मला ॲलर्जी आहे!' त्यांनी असं म्हणताच याचिकाकर्त्याने मराठीत बोलायला सुरुवात केली. तेव्हा चंद्रचूड यांनी त्याला मराठीत समजावलं. नंतर याचिकाकर्त्याच्या वकिलाने आपल्या बोलण्यात सुधारणा केली.
advertisement
या याचिकेत देशाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधात चौकशीची मागणी करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टानेच या प्रकरणी चौकशी करावी असं या याचिकाकर्त्याचं म्हणणं होतं. या याचिकेच्या सुनावणीदरम्यान माजी सरन्यायाधीश गोगोई यांचं नाव काढून टाकण्यात यावं असे आदेश सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्याला दिले. गोगोई हे सध्या राज्यसभेचे खासदार आहेत.
advertisement
सदर याचिकेवरील सुनावणीदरम्यान माजी सरन्यायाधीशांना प्रतिवादी करुन तुम्ही जनहित याचिका कशी दाखल करु शकता, असा सवाल सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी उपस्थित केला. हे प्रकरण थेट अनुच्छेद 32 अंतर्गत याचिका दाखल करण्याच्या योग्यतेचं तरी आहे का असंही चंद्रचूड यांनी विचारलं. त्यामुळे हा वाद अधिकच चिघळला. (अनुच्छेद 32 हे पायाभूत अधिकारांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागायचा अधिकार देतं)
advertisement
सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या प्रश्नाला उत्तर देताना याचिकाकर्ता म्हणाला, ‘ya, ya. तत्कालीन सरन्यायाधीश गोगोई यांनीच मला क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करायला सांगितली होती.’ त्यावर चंद्रचूड यांनी याचिकाकर्त्याला चांगलंच फैलावर घेतलं. ‘गोगोई हे या न्यायालयाचे न्यायाधीश होते. एका न्यायाधीशाच्या विरोधात तुम्ही अशी याचिका करुन आंतरिम तपासणीची मागणी करु शकत नाही. बेंचसमोर तुम्ही युक्तीवाद केल्यानंतर तुमची याचिका फेटाळण्यात आली होती,’ असंही चंद्रचूड यावेळी म्हणाले. त्यावेळी याचिकाकर्त्याने या प्रकरणाची पार्श्वभूमी सांगण्याचा प्रयत्न केला. ‘सरन्यायाधीश गोगोई यांनी माझी याचिका फेटाळली. त्यानंतर मी त्या निर्णयाला आव्हान दिलं होतं. कामगार कायद्यांची माहिती असलेल्या बेंचकडे माझी याचिका हस्तांतरित करण्याची विनंती मी सरन्यायाधीश ठाकूर यांना केली मात्र ती मान्य झाली नाही,’ असं याचिकाकर्त्याने यावेळी सांगितलं. गोगोईंचं नाव काढल्यानंतर रजिस्ट्री तुमच्या याचिकेवर विचार करेल असंही चंद्रचूड यांनी स्पष्ट केलं.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 30, 2024 4:08 PM IST
मराठी बातम्या/Viral/
वकिलाची नुसती शायनिंग, कोर्टात म्हणतोय YA YA YA ; CJI चंद्रचूड संतापले, नक्की प्रकरण काय?