नवरा जेवण बनवत नाही, रागावली बायको; उचललं टोकाचं पाऊल
- Published by:Priya Lad
Last Updated:
पतीला घटस्फोट देण्याच्या तयारीत असलेल्या या महिलेनं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. ज्यामध्ये तिनं यामागील कारणही सविस्तरपणे सांगितलं आहे. जे आश्चर्यकारक आहे.
लंडन : पती-पत्नी म्हटलं की त्यांच्यात भांडणं आलीच. पण काही वेळा छोटे-छोटे वाद कधी मोठे होतात आणि विकोपाला जातात कळत नाही. प्रकरण अगदी घटस्फोटापर्यंत पोहोचतं. पण घटस्फोटाची अशी काही विचित्र कारणं ही आपण कधी विचारही केला नसेल. असंच एक घटस्फोटाचं प्रकरण चर्चेत आलं आहे. ज्यात नवरा जेवण बनवत नाही म्हणून पत्नीनं घटस्फोट देण्याचा विचार केला आहे.
ब्रिटनमधील हे प्रकरण. एका महिलेने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. तिनं आपण आपल्या पतीला घटस्फोट देण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं. यामागील कारणही तिनं सविस्तर सांगितलं आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. तिनं सांगितल्यानुसार तिचा नवरा तिच्यापेक्षा कमी तास काम करतो, तरीही तो घरच्या कामात मदत करत नाही. तिनं मदत मागितली तर तो तिच्याकडे लक्ष देत नाही.
advertisement
आश्वासन देऊनही पतीनं जेवण बनवलं नाही
गेल्या काही दिवसांपासून तिची शिफ्ट सुरू होती. अशा स्थितीत तिच्या पतीने रात्रीचा स्वयंपाक करण्याचं आश्वासन दिलं होतं. 12 तास काम करून ती घरी परतली तेव्हा खायला काहीच नव्हतं. तिच्या पतीने रात्रीचे जेवणच बनवलं नव्हतं. तिनं त्याला याबाबत विचारलं जेव्हा विचित्र कारण दिलं. मला स्वयंपाक करायला आवडत नाही, म्हणून स्वयंपाक केला नाही, असं त्यानं सांगितलं.
advertisement
महिलेने पुढे सांगितलं की, मोकळ्या वेळेत तिचा नवरा एकतर यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो किंवा झोपून राहतो. तिने आपल्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने मांडण्याचा अनेकवेळा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. यावेळी मात्र तिचाही संयम सुटला. तिच्या पतीला तिचा आदर नाही, तेव्हा ती देखील त्याचा आदर करू शकत नाही
advertisement
आता घटस्फोट घेण्याचा विचार
महिलेने पोस्टमध्ये म्हटलं की, एका रात्री जेव्हा तिच्या पतीनं जेवण तयार केलं नाही, तेव्हा तिनं स्वतःसाठी बाहेरून जेवण आणलं. तिनं पतीसाठी काहीच खायला आणलं नाही. यानंतर तिनं जास्तीचं अन्नअन्न तयार केलं होतं आणि ते घरी ठेवलं होतं. जेणेकरून ती जास्त तासांची शिफ्ट करून घरी परतल्यावर तिला खाण्याचं टेन्शन नाही. पण ते सगळं तिच्या पतीनं खाल्लं असं तिनं सांगितलं.
advertisement
आता ती तिच्या पतीच्या वागण्याला कंटाळली आहे आणि आता घटस्फोट घेणार आहे. असं वृत्त मिरर ऑनलाईनं दिसलं आहे.
Location :
Delhi
First Published :
Sep 27, 2024 11:36 AM IST







