बायकोला बिकिनीमध्ये अंघोळ करण्याचा शौक, पठ्ठ्याने 418 कोटींचं बेटच विकत घेतलं!
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ती 26 वर्षीय सौदी ब्रिटिश महिला आहे. काही वर्षांपूर्वी ती दुबईला शिक्षणासाठी गेली होती, तिथे तिची जमालशी ओळख झाली. काही वेळातच दोघेही प्रेमात पडले आणि नंतर त्यांचे लग्न झाले.
मुंबई : 'शौक बडी चीज है भैया!' असं लोकांना बोलताना तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण हे शौक तेव्हाच पुरे होऊ शकतात, जेव्हा माणसाकडे पैसा असतो. पैशांशिवाय माणसू फक्त आपल्या गरजा भागवण्यासाठी धावपळ करु शकतो. पण पैसा असेल तर जगातील कोणतीच गोष्ट त्या व्यक्तीसाठी अशक्य नाही. अशीच काहीशी बातमी सोशल मीडियावर समोर आली आहे. ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या बायकोचे शौक पूर्ण करण्यासाठी संपूर्ण बेटच विकत घेऊन टाकलं.
दुबईचा जमाल अल नदाकची बायको सौदी अल नदाकला बिकिनी घालून आंघोळ करण्याची शौकीन होती. तिने हे पती जमालला सांगितले तेव्हा त्याने 418 कोटी रुपये खर्च करून संपूर्ण बेट विकत घेतले. जेणेकरून इतर कोणीही तेथे जाऊ नये. खुद्द सौदी अल नदाकने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे, जी व्हायरल होत आहे.
advertisement
ती 26 वर्षीय सौदी ब्रिटिश महिला आहे. काही वर्षांपूर्वी ती दुबईला शिक्षणासाठी गेली होती, तिथे तिची जमालशी ओळख झाली. काही वेळातच दोघेही प्रेमात पडले आणि नंतर त्यांचे लग्न झाले. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हिडीओ शेअर करताना सौदीने लिहिले की, ही आतापर्यंतची सर्वोत्तम गुंतवणूक आहे. व्हिडीओमध्ये सौदिया पती जमालसोबत पोज देताना दिसत आहे. यानंतर जमालला विमानात बसलेले दाखवले जाते आणि त्यानंतर आशियातील खाजगी बेट दिसते, जे जमालने सौदीसाठी विकत घेतले आहे. व्हिडीओमध्ये एक मेसेजही लिहिला आहे. सौदीला बिकिनी घालायची होती, म्हणून तिच्या करोडपती नवऱ्याने तिच्यासाठी एक बेट विकत घेतले.
advertisement
करोडोच्या भेटवस्तू, लाखो किमतीचे जेवण मात्र, जमालने पत्नीवर इतके पैसे खर्च करण्याची ही पहिलीच वेळ नाही. सौदी अल नदाक स्वतः सांगत असते की तिचा नवरा तिला काय गिफ्ट देतो.
काही दिवसांपूर्वी जमालने सौदीला फरारी गिफ्ट केली होती. ही गाडी इटलीमधून आयात केले गेले. तिला हिऱ्याची अंगठीही जमालने दिली होती, ज्याची किंमत 8.22 कोटी रुपये होती. हे जोडपे रोज संध्याकाळी डिनर डेटवर जातात आणि त्यांचा खर्च दररोज एक लाख रुपये आहे. बेट खरेदीबाबत सौदी म्हणाली- 'आम्हाला खूप दिवसांपासून गुंतवणूक करायची होती. कारण समुद्रकिनारी फिरताना मला सुरक्षित वाटावे अशी माझ्या नवऱ्याची इच्छा होती. म्हणूनच त्याने हे बेट विकत घेतले.
advertisement
advertisement
बेट खूप सुंदर आहे... असं कॅप्शन दिलेला सौदीचा व्हिडीओ शेअर होताच व्हायरल झाला. वापरकर्त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. काही लोकांना हे खरे प्रेम वाटले तर काहींना ते पैशाची उधळपट्टी वाटत आहे. एका युजरने लिहिले की, जर तुमच्याकडे खूप पैसे असतील तर कृपया ते दक्षिण सुदानच्या लोकांना दान करा, ज्यांना त्याची खरोखर गरज आहे. अनावश्यक ठिकाणी पैसे खर्च करणे टाळले तर बरे होईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Sep 26, 2024 7:40 PM IST







