advertisement

Viral Video : रस्त्याच्या मधून जात होता कोब्रा, बाजूने बाईक जाताच अटॅक करण्यासाठी धावला आणि...

Last Updated:

कधी टॉयलेट सीटच्या आत कोब्रा लपलेला असतो, कधी शॉवरवर साप लटकलेला आढळतो तर कधी स्कूटीमध्ये लपलेला आढळतो. असे व्हिडीओ पाहिल्यावर लोकांना नक्कीच धक्का बसतो.

किंग कोब्रा व्हिडीओ
किंग कोब्रा व्हिडीओ
मुंबई, 03 ऑगस्ट : सोशल मीडिया हे व्हिडीओचं भंडार आहे. इथे एकदा आलात की तुम्हाला असंख्य व्हिडीओ पाहायला मिळतील. जे पाहण्यात लोकांचा वेळ कसा जातो हे त्यांचं त्यांनाच कळत नाही. इथे लोक आपल्या आवडीचे व्हिडीओ पाहतात. त्यात काही लोक प्राण्यांचे व्हिडीओ पाहतात तर काही लोक फूड किंवा मेकअप इत्यादी व्हिडीओ पाहातात.
शिवाय सापांसंदर्भात देखील तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असणार. अनेकदा किंग कोब्राचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. कधी टॉयलेट सीटच्या आत कोब्रा लपलेला असतो, कधी शॉवरवर साप लटकलेला आढळतो तर कधी स्कूटीमध्ये लपलेला आढळतो. असे व्हिडीओ पाहिल्यावर लोकांना नक्कीच धक्का बसतो.
advertisement
अनेकवेळा किंग कोब्रा हल्ल्याचे धोकादायक व्हिडीओही पाहायला मिळतात. आता असाच एक धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक साप रस्त्याच्या मधोमध जाताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कोब्रा रस्त्याच्या मधोमध रेंगाळताना दिसत आहे आणि त्यानंतर एक बाईक त्याच्याजवळून जात आहे. दुचाकीवर दोघेजणही स्वार होते. दुचाकीस्वार वाहनाचा वेग वाढवून सापाला ओव्हरटेक करतात. परंतू बाईक इतक्या जवळून गेली हे पाहून सापाला राग येतो आणि तो फना काढून बाईकमागे जातो. पण बाईकचा वेग जास्त असल्यामुळे सापाला त्यांचा पाठलाग करता आला नाही.
advertisement
कोब्राने बाईकवर कसा धोकादायक पद्धतीने हल्ला केला ते तुम्ही पाहिले, पण दुचाकीस्वार मात्र यातून बचावला. पुढे हे दुचाकीस्वार आपल्या गाडीचा स्पीड कमी करतात आणि मागे वळून पाहातात तेव्हा त्यांना ही धडकी भरते.
View this post on Instagram

A post shared by India YaTra (@india.yatra)

advertisement
हा व्हिडिओ india.yatra नावाच्या अकाऊंटवरून इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 6 लाखांहून अधिक वेळा लाईक करण्यात आले आहे. या व्हिडीओवर लोक खूप कमेंट करत आहेत. व्हिडीओमध्ये ज्या पद्धतीने सापाने बाईकवर हल्ला केला ते पाहून कोणालाही नक्कीच धक्का बसेल.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral Video : रस्त्याच्या मधून जात होता कोब्रा, बाजूने बाईक जाताच अटॅक करण्यासाठी धावला आणि...
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement