आईनं मुलीच्या बॉयफ्रेंडला पाठवलं गिफ्ट, समोरुन जे उत्तर आलं त्याचा तिनं विचार देखील तिने केला नसावा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
व्हिडिओच्या शेवटी तो तरुण इंग्रजीत म्हणतो, “Thank you once again, the gifts were really beautiful.” त्याच्या बोलण्यातली प्रामाणिकता आणि नम्रता पाहून लोकांना त्याचं अप्रुप वाटलं.
मुंबई : आजच्या ग्लोबल जगात भाषा, धर्म, संस्कृती या सगळ्यांच्या पलीकडे एक गोष्ट सगळ्यांना जोडते. ती म्हणजे प्रेम. आणि हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं एका सुंदर व्हिडिओमधून, ज्यात आयर्लंडचा एक तरुण आपल्या भारतीय प्रेयसीच्या आईशी हिंदीत बोलताना दिसतो. त्याचा तो छोटासा प्रयत्न इतका गोड वाटला की इंटरनेटने त्याला थेट *‘परफेक्ट बॉयफ्रेंड’*चा किताब दिला.
हा व्हिडिओ एका भारतीय कंटेंट क्रिएटर आणि तिच्या आयरिश पार्टनरचा आहे. दिवाळीच्या निमित्ताने आईने पाठवलेल्या गिफ्टचं पार्सल मिळाल्यावर त्या मुलाने तिला फोन केला. फोनवर त्याने हसत विचारलं, “कसे आहात?” आणि लगेच म्हणाला, “आपके पार्सल मिला, शुक्रिया.” इतकं साधं वाक्य, पण त्यामागचं मनापासूनचं प्रेम आणि आदर हेच लोकांच्या मनाला भिडलं.
व्हिडिओच्या शेवटी तो तरुण इंग्रजीत म्हणतो, “Thank you once again, the gifts were really beautiful.” त्याच्या बोलण्यातली प्रामाणिकता आणि नम्रता पाहून लोकांना त्याचं अप्रुप वाटलं. त्याच्या गर्लफ्रेंडने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत लिहिलं, “Some moments need no translation.” म्हणजेच काही भावना शब्दांच्या मर्यादेत बसतच नाहीत.
advertisement
हा व्हिडिओ पोस्ट होताच काही तासांतच हजारो लोकांनी तो शेअर केला. कमेंट सेक्शनमध्ये एकानंतर एक प्रेमळ प्रतिक्रिया आल्या एक यूजरने लिहिलं, “किती गोड आणि आदरयुक्त बोलतो तो” तर दुसऱ्याने लिहिलं, “हे भविष्याचं दर्शन आहे माझा नवरा पण माझ्या आईला ‘मम्मी, बेसन लाडू खूप छान होते’ असं म्हणतो.”
सगळ्यांनाच या छोट्याशा प्रयत्नातून एक मोठा संदेश मिळाला नाती जर खर्या मनाने जोडले असतील, तर भाषा कधीच भिंत बनत नाही.
advertisement
advertisement
इंटरनेटवर सर्वात सुंदर इंडो-आयरिश जोडी
या जोडप्याचा एक संयुक्त इंस्टाग्राम अकाउंट आहे, जिथे ते दोन्ही देशांच्या संस्कृती, सण आणि प्रेमाच्या क्षणांची झलक दाखवतात. त्यांच्या बायोमध्ये एक सुंदर ओळ लिहिलीय
“भारतीय-आयरिश कपल, सुंदर जीवनाच्या शोधात.” त्यांचा प्रत्येक व्हिडिओ हे सिद्ध करतो की, प्रेम जेव्हा दोन संस्कृतींना जोडतं, तेव्हा ते फक्त भावना नसून एक सुंदर अनुभव बनतं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 21, 2025 5:16 PM IST
मराठी बातम्या/Viral/
आईनं मुलीच्या बॉयफ्रेंडला पाठवलं गिफ्ट, समोरुन जे उत्तर आलं त्याचा तिनं विचार देखील तिने केला नसावा