गुहेतून यायचा घंटीचा आवाज; 3 महिन्यांनी असं काही बाहेर आलं की अख्खं गाव थरथर कापू लागलं
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
गुप्तधाममधील गुहेतून घंटाचा आवाज यायचा. पुजाऱ्याने याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र...
लखनऊ : सोनभद्र जिल्ह्यातील कोन पोलीस स्टेशन परिसराला लागून झारखंडमधील रानीडीह परिसर आहे. रानीडीह येथील गुप्तधाम गुहेतील शंकराची मूर्ती खूप जुनी आहे. शिवरात्रीच्या दिवशी येथे जत्रा भरते. दर्शनासाठी लांबून लोक येतात. भक्त भगवान शंकराची पूजा करतात. मात्र, एवढ्यात गुप्तधाममधील गुहेतून घंटाचा आवाज यायचा. पुजाऱ्याने याकडे फारसं लक्ष दिलं नाही. मात्र, श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जे घडलं ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटलं.
येथे गुहेच्या आत एक तरुणी सापडली जी सापासारखी विचित्र कृत्यं करत होती. ही घटना गावात चर्चेचा विषय ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, झारखंड राज्यातील करिवाडीह खरोंधी भागातील एक मुलगी दोन-तीन महिन्यांपासून घरातून बेपत्ता होती. कुटुंबीयांनी मुलीचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र तिचा शोध लागला नाही. असा दावा केला जात आहे की, दोन-तीन दिवसांपूर्वी मुलगी कुटुंबीयांच्या स्वप्नात आली आणि तिने आपण गुप्तधाममध्ये असल्याचं सांगितलं. तुम्ही लोक मला अखंड कीर्तन करून घरी घेऊन जाऊ शकता, असं ती त्यांना म्हणाली.
advertisement
कुटुंबीयांचा दावा आहे, की ते गुहेत पोहोचले आणि आत तपासण्यात आलं. मात्र मुलगी सापडली नाही. रविवारी रात्रीपासून कीर्तन केलं. यानंतर रात्रीच्या वेळी मुलगी नागासारखी हालचाल करत गुहेच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर आली. कीर्तन करणारे लोक घाबरले. घरातील काही सदस्यांनी तिला ओळखलं. ही बातमी समजताच नागरिकांची गर्दी होऊ लागली. काही लोकांनी व्हिडिओ बनवला आणि तो व्हायरल झाला. हळूहळू गर्दी वाढत गेली.
advertisement
सोमवार होता. त्यामुळे, सकाळपासूनच लोकांची गर्दी होऊ लागली. ही मुलगी पक्ष्याच्या वेशात आली होती, असा गावकऱ्यांचा दावा आहे. ती तीन महिने गुहेत होती. पुजाऱ्याने सांगितलं, की गुहेच्या आत घंटा वाजल्याचा आवाज यायचा, पण गुहेच्या आत कोणी आहे हे समजत नव्हतं. पुजारी रोज गुहेत ये-जा करत असे. घरातील सदस्यांनी मुलीला अखेर वाजत-गाजत घरी नेलं. अनेक मंदिरात पूजाअर्चा करून घरात प्रवेश केला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2024 8:18 AM IST
मराठी बातम्या/Viral/
गुहेतून यायचा घंटीचा आवाज; 3 महिन्यांनी असं काही बाहेर आलं की अख्खं गाव थरथर कापू लागलं


