Pune News : मोठी बातमी! पुणे porsche कार अपघात प्रकरणाला नवं वळण, अल्पवयीन आरोपीची पोलिसांना धक्कादायक माहिती

Last Updated:

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलानं पोलीस चौकशीत धक्कादायक माहिती दिली आहे. पुण्यात रविवारी भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दोघांना उडवलं, या घटनेत दोन अभियंत्यांचा मृत्यू झाला.

पुणे पोर्श अपघात प्रकरण
पुणे पोर्श अपघात प्रकरण
पुणे, चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी :  पुण्यात रविवारी भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने (Pune Porsche Accident) दोघांना उडवलं, या घटनेत दोन अभियंत्यांचा  मृत्यू झाला.  या प्रकरणातील आरोपी अल्पवयीन असून त्याला न्यायालयाने काही तासांत जामीन मंजूर केला. मात्र या मुलाच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. वडिलांनीच मला पार्टीसाठी परवानगी दिल्याचं या मुलानं म्हटलं आहे. मी कार चालविण्याचं रीतसर प्रक्षिण घेतलेलं नसतानाही वडिलांनी त्यांची पोर्श कार मला चालवायला दिली असा धक्कादायक खुलासाही या मुलानं केला आहे.
नेमकं काय म्हटलं?  
रविवारी पुण्यात भीषण कार अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या पोर्श कारने दुचाकीवर असलेल्या दोघांना चिरडलं.  यामध्ये इंजिनिअर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. आता या प्रकरणात अल्पवयीन आरोपीने धक्कादायक खुलासा केला आहे. 'वडिलांनीच मला पार्टीसाठी परवानगी दिली. मी मद्यप्राशन करतो हे वडिलांना माहित होतं. मी कार चालविण्याचं रीतसर प्रक्षिण घेतलेलं नसतानाही वडिलांनी त्यांची पोर्श कार मला चालवायला दिली' अशी धक्कादायक माहिती आरोपीने पोलिसांना दिली आहे. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी मुलाच्या वडिलांसह पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे, बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्यावर देखील गुन्हा दाखल केला आहे.
advertisement
काय आहे नेमकं प्रकरण? 
पुण्यातील ब्रम्हा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलानं पोर्श कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण-तरुणीला चिरडलं. यामध्ये इंजिनिअर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली आहे. या घटनेनंतर पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News : मोठी बातमी! पुणे porsche कार अपघात प्रकरणाला नवं वळण, अल्पवयीन आरोपीची पोलिसांना धक्कादायक माहिती
Next Article
advertisement
High Court On Mumbai Air Pollution: हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर्टात घडलं काय?
हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर
  • हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून (AQI) उच्च न्यायालयाने आज महापालिका प्रशासनाचे अक्

  • याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर धक्कादायक माहिती मांडली.

  • महापालिका आयुक्तांचे वेतन का रोखू नये असा सवाल हायकोर्टाने विचारला.

View All
advertisement