80 दिवसात तब्बल दीड लाख रुपयांचं उत्पन्न, सोलापुरच्या शेतकऱ्यानं नेमकं कोणत्या पिकाची लागवड केली?, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
solapur farmer success story - सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा डाळींब उत्पादक म्हणून ओळखला जातो. परंतु बदलत्या हवामानानुसार येथील बागांवर परिणाम झाला. त्यामुळे येथील शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळला आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर - शेतकरी सातत्याने आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. या माध्यमातून चांगले उत्पन्न देखील मिळते, हे अनेक शेतकऱ्यांनी सिद्धही करुन दाखवले आहे. आज अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी स्वीट कॉर्न मका लागवडीतून 80 दिवसात दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.
देवदत्त भोसले असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते सांगोला तालुक्यातील चिक महुद येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या शेतात स्वीट कॉर्न मकेची लागवड करून त्यातून केवळ 80 दिवसात दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. लोकल18 च्या टीमशी बोलताना त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.
advertisement
2 एकर क्षेत्रात 9 टन उत्पादन -
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुका हा डाळींब उत्पादक म्हणून ओळखला जातो. परंतु बदलत्या हवामानानुसार येथील बागांवर परिणाम झाला. त्यामुळे येथील शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळला आहे. या तालुक्यातील चिक महुद येथील शेतकरी देवदत्त भोसले यांनी आपल्या उसाच्या शेतात आंतरपीक म्हणून स्वीट कॉर्न मकेची लागवड केली असून याठिकाणी 2 एकर क्षेत्रात 9 टन उत्पादन निघाले आहे.
advertisement
यामध्ये 12 रुपये प्रति किलो दराने या स्वीट कॉर्नची शेतातूनच विक्री झाली. त्यामुळे ट्रान्सपोर्टचा देखील खर्च वाचला. एकरी स्वीट कॉर्नची बियाणे, खत, लागवड त्याचा सर्व मिळून 12 हजार रूपये पर्यंत खर्च आला. या माध्यमातून स्वीट कॉर्न विक्रीतून केवळ 80 दिवसात दीड लाख रुपयांचे उत्पन्न शेतकरी देवदत्त भोसले यांनी मिळवले आहे.
advertisement
स्वीट कॉर्न मका कमी कालावधीमध्ये निघत असून याचा ऊसावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. तर या आंतर पिकामुळे अतिरिक्त उत्पन्न देखील मिळते. या स्वीट कॉर्नची कणसे विकल्यानंतर उरलेला हिरवा चारा आपल्या जनावरांसाठी वापरता येतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी ही शेती करायला हरकत नाही, असा सल्ला शेतकरी देवदत्त भोसले यांनी दिला आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 09, 2024 11:48 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
80 दिवसात तब्बल दीड लाख रुपयांचं उत्पन्न, सोलापुरच्या शेतकऱ्यानं नेमकं कोणत्या पिकाची लागवड केली?, VIDEO