कृषी हवामान : शेतकऱ्यांनो! आता सुट्टी नाही, तुफान पाऊस पडणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पिकांसाठी उपाययोजना काय?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Maharashtra Weather Update : राज्यभर पावसाचा जोर कमी-जास्त प्रमाणात जाणवत आहे. काही भागांत पाऊस ओसरल्याचे दिसत असताना काही जिल्ह्यांत अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई : राज्यभर पावसाचा जोर कमी-जास्त प्रमाणात जाणवत आहे. काही भागांत पाऊस ओसरल्याचे दिसत असताना काही जिल्ह्यांत अजूनही वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी उन्हाचा तडाखा वाढला असून तापमानात वाढ होत आहे. हवामान खात्याने ११ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
कोकण आणि मुंबई
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी आकाशात ढगाळ वातावरण राहील. मुंबईतील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस आणि किमान २४ अंश सेल्सिअस इतके राहील.
पश्चिम महाराष्ट्र
पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यांत ढगांचा गडगडाट आणि हलक्या पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला गेला आहे. पुण्यात कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान २० अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
मराठवाडा
छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यांत हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. संभाजीनगरमध्ये कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस व किमान २२ अंश सेल्सिअस इतके राहील.
उत्तर महाराष्ट्र
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. नाशिकमध्ये कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस व किमान १९ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
विदर्भ
अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत पावसाची शक्यता नाही. मात्र नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये विजांचा कडकडाट व मुसळधार पावसाची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूरमध्ये कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस आणि किमान २४ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.
advertisement
शेतकऱ्यांना फवारणीसाठीचा सल्ला
सध्याच्या हवामानामुळे सोयाबीन, मका आणि कापूस ही पिके परीपक्वतेच्या टप्प्यात आहेत. या काळात पिकांच्या संरक्षणासाठी काही उपाय महत्त्वाचे ठरतात :
सोयाबीन : पानांवर करपा, सुरवंट किंवा अळींचा प्रादुर्भाव दिसल्यास एमामेक्टिन बेन्झोएट (३ ग्रॅम/१० लिटर पाणी) किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल (०.४ मि.ली./लिटर) फवारणी करावी.
मका : अमेरिकन फॉल आर्मी वर्मपासून संरक्षणासाठी स्पिनोसेड (०.३ मि.ली./लिटर) किंवा फ्लुबेंडामाईड (०.५ मि.ली./लिटर) फवारावे.
advertisement
कापूस : बोंडअळी व गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल किंवा स्पिनेटोराम यांची शिफारस केली जाते. तसेच शेंडेगळीत रसशोषक कीड आढळल्यास इमिडाक्लोप्रिड (०.३ मि.ली./लिटर) वापरावे.
दरम्यान, सतत पावसामुळे फवारणीनंतर औषध धुवून जाण्याचा धोका असतो. त्यामुळे हवामान स्वच्छ किंवा ढगाळ परंतु पाऊस नसताना फवारणी करणे उत्तम ठरेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 11, 2025 7:52 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
कृषी हवामान : शेतकऱ्यांनो! आता सुट्टी नाही, तुफान पाऊस पडणार, या जिल्ह्यांना हाय अलर्ट, पिकांसाठी उपाययोजना काय?


