advertisement

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, शेतकऱ्यांना नेमका कसा मिळतो लाभ?

Last Updated:

Agriculture Scheme: शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. यातीलच एक प्रमुख योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना होय.

+
डॉ.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, शेतकऱ्यांना नेमका कसा मिळतो लाभ?

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर: शेती हा बेभरवशाचा व्यवसाय मानला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबविल्या जातात. यातीलच एक प्रमुख योजना म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना होय. अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी ही योजना आहे. याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी माहिती दिलीये.
advertisement
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी महत्त्वाची योजना आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची शाश्वत सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांचे उत्पन्न वाढविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना नवीन विहिरीसाठी 4 लाख रुपयांचे अनुदान दिले जाते. तर जुनी विहीर दुरुस्तीसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
advertisement
शेततळ्यासाठीही अनुदान
शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध व्हाव्यात म्हणून शेततळ्याच्या प्लास्टिक अस्तरीकरणासाठी देखील या योजनेतून शेतकऱ्यांना पैसे दिले जातात. शेततळ्याच्या आकारमानानुसार प्रत्यक्ष खर्चाच्या 90 टक्के किंवा 2 लाख रुपये यातील जे कमी असेल तेवढी रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. मुंबई वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यांत ही योजना राबविली जाते, असेही पाटील यांनी सांगितले.
advertisement
या योजनेचा लाभ 0.40 ते 6.00 हेक्टर पर्यंत वाहीत क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना मिळतो. तसेच या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यात आणि आर्थिक उत्पन्न वाढण्यास देखील मदत झाली असल्याचे पाटील यांनी सांगितेल.
लगेच करा ऑनलाईन अर्ज
विहीर दुरुस्तीसाठी किंवा नवीन विहीर करण्यासाठी देखील या योजनेअंतर्गत अनुदान हे देण्यात येते. हे अनुदान 50 हजारपर्यंत देण्यात येते. त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी महाडीबीटी वेबसाईट वर जाऊन नोंदणी करायची आहे. तसेच त्याच्या मार्फतच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे. जेणेकरून त्यांना शेती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या योजनेच लाभ घ्यावा, असं आव्हान प्रकाश पाटील यांनी केलेला आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, शेतकऱ्यांना नेमका कसा मिळतो लाभ?
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement