शेतकऱ्याच्या लेकाची कमाल, काश्मिरचं ‘सोनं’ घरात उगवलं! आता ब्रॅंडच तयार केला
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
केशरची शेती मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे. याच्या माध्यमातून त्यांना यावर्षी चांगला नफा देखील झालेला आहे.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : केशरचे उत्पन्न घ्यायचे म्हटले तर त्यासाठी आपल्याला काश्मीर सारखे वातावरण निर्माण करावे लागते आणि त्यासाठी खूप खर्च देखील होतो. पण याच केशरची शेती मराठवाड्यासारख्या दुष्काळग्रस्त भागात राहणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे. याच्या माध्यमातून त्यांना यावर्षी चांगला नफा देखील झालेला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील आसाराम गव्हाणे यांनी केशर लागवडीतून चांगला नफा मिळवला आहे.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील जयभवानीनगरमध्ये राहणारे आसाराम गव्हाणे यांनी आपल्या घरातील एका छोट्या रूममध्ये केशरची लागवड केलेली आहे. आसाराम यांचे आई-वडील शेतीच करायचे. आसाराम यांचे संभाजीनगर शहरामध्ये एक फार्मसी स्टोअर आहे. गेल्या वर्षी ते त्यांच्या मित्रांसोबत लेह-लडाखमध्ये बाईक ट्रिपवर गेले होते आणि या ठिकाणाहून ते काश्मीरला देखील गेले होते. काश्मीरला गेल्यानंतर त्यांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारची शेती बघितली आणि त्यासोबतच त्यांना केशर शेती देखील बघता आली आणि त्यांना ती खूप आवडली.
advertisement
त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना सांगितले की, तुमच्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक नागरिक इंडोर केसरची शेती करत आहेत. ते जेव्हा त्यांच्या ट्रिपवरून परत आले त्यानंतर त्यांनी युट्युबला माहिती घेतली आणि त्या ठिकाणी त्यांना माहिती मिळाली की पुण्यामध्ये देखील अनेक नागरिक याची शेती करत आहेत. त्यांनी पुण्याला जाऊन याचे प्रशिक्षण घेतले आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांनी ठरवले की, आपण आता याची शेती करायची. त्यानंतर ते स्वतः काश्मीरला गेले आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी केशरचे कंद मागून घेतले. आणि तोपर्यंत त्यांनी सर्व लागणारे सेटअप देखील तयार केले.
advertisement
जुलै 2022 मध्ये त्यांना केशरचे सगळे कंद प्राप्त झाले. पण ट्रान्सपोर्ट दरम्यान बरेचसे कंद हे खराब देखील झाले होते. त्यांनी ऑगस्टमध्ये याची लागवड केली आणि साधारणपणे त्यांना ऑक्टोबर शेवटी याचे उत्पादन निघायला सुरुवात झाली. ऑक्टोबरच्या शेवटी त्यांच्या सर्व कंदांना फुले आली. त्याच्यामध्ये त्यांना 500 ग्रॅम एवढे केशर मिळाले. त्यानंतर त्यांनी स्वतःचा 'यश सॅफ्रॉन फार्म' म्हणून एक ब्रँड देखील तयार केला आणि याच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या केशरची विक्री केली. आणि याच्या माध्यमातून त्यांना साडेतीन लाख रुपये एवढे उत्पन्न मिळालेले आहे. त्यांचा हा ब्रँड ॲमेझॉनवर देखील उपलब्ध आहे, असं आसाराम गव्हाणे यांनी सांगितलं.
advertisement
view comments
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 18, 2024 1:55 PM IST

title=केसर लागवड तून मिळवलं चांगला नफा 







