अडीच महिन्यात 45 लाखांचं उत्पन्न? सोलापूरच्या शेतकऱ्यानं सांगितलं गणित
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Agriculture Success: सध्याच्या काळात काही शेतकरी तरकारी पिकांच्या शेतीतून भरघोस उत्पन्न घेत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्याने 8 एकर कोबीची शेती केलीये.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : सध्याच्या काळात कमी काळात भरघोस उत्पन्न देणाऱ्या तरकारी शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी भाजीपाल्याची शेती करत आहेत. मोहोळ तालुक्यातील घोडेश्वरच्या शेतकऱ्याने 8 एकर शेतीत कोबीची लागवड केलीये. सध्याचे दर कायम राहिल्यास या कोबी शेतीतून अडीच महिन्यात 45 लाखांपर्यंत उत्पन्न मिळेल, असं शेतकरी अस्लम चौधरी यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
advertisement
मोहोळ तालुक्यातील बेगमपूर जवळ घोडेश्वर हे गाव आहे. या ठिकाणी शेतकरी अस्लम चौधरी यांची शेती आहे. बी.एससी.पर्यंत शिक्षण घेतलेले अस्लम हे गेल्या काही काळापासून आधुनिक पद्धतीने व्यवसायिक शेती करतात. त्यांनी आपल्या 8 एकर शेतात कोबी लागवड केलीये. यासाठी त्यांना 5 लाखांपर्यंत खर्च आला आहे. आता एका कोबीचे वजन एक ते दीड किलोपर्यंत आहे. त्यामुळे 200 टनापर्यंत पत्ता कोबी निघेल, असा अंदाज असल्याचं चौधरी सांगतात.
advertisement
45 लाखांपर्यंत उत्पन्नाची आशा
पत्ता कोबी हे पीक केवळ अडीच महिन्यात काढायला येते. लवकरच हा कोबी काढून बाजारात पाठवण्यात येणार आहे. 8 एकर शेतीत 200 टनांपर्यंत माल निघण्याचा अंदाज आहे. सध्याच्या बाजारभावानुसार 20 रुपये प्रतिकिलोने विचार केल्यास 45 लाखांपर्यंत उत्पन्न होईल, असा विश्वास शेतकरी चौधरी व्यक्त करतात. चौधरी यांची कोबीची शेती यशस्वी ठरल्याने पंचक्रोशितील शेतकऱ्यांत त्यांच्या या प्रयोगाची चर्चा आहे. तर व्यापारी त्यांच्या शेतातूनच कोबीची खरेदी करत आहेत.
advertisement
शेतकऱ्यांना सल्ला
view commentsशेतकऱ्यांनी परंपरागत शेती बाजूला सारून कमी वेळेत जास्त उत्पन्न, जास्त पिके कशी घेता येईल हे बघितलं पाहिजे. योग्य व्यवस्थापन, तणनियंत्रण ठेवल्याने शेतीतून चांगले उत्पादन मिळत आहे. इतर शेतकऱ्यांनीही या पद्धतीने योग्य नियोजन करून आधुनिक शेती केल्यास नक्कीच फायदा होईल, असेही प्रयोगशील शेतकरी चौधरी सांगतात.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Dec 17, 2024 2:45 PM IST







