क्रिकेट खेळता खेळता अचानक मैदानावर कोसळला, रुग्णालयात दाखल करताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला, काय घडलं?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कोल्हापूरमध्ये क्रिकेट खेळता खेळता एक मुलगा मैदानावर कोसळला.त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची घटना समोर आली आहे. उत्कर्ष देसाई असे या 17 वर्षीय तरूणाचे नाव आहे.
Kolhapur News : राज्यभरात सध्या महापालिकेचा अर्ज भरण्यावरून सर्वत ठिकाणी राडा सूरू असताना तिकडे कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरमध्ये क्रिकेट खेळता खेळता एक मुलगा मैदानावर कोसळला.त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्याची घटना समोर आली आहे. उत्कर्ष देसाई असे या 17 वर्षीय तरूणाचे नाव आहे. कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पाटगावात राहायचा.त्याच्या या अकस्मात मृत्यूने देसाई कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 17 वर्षीय उत्कर्ष देसाई हा पाटगावमध्ये हाफ पिटच टेनिस बॉलचा क्रिकेट सामना खेळत होता. हा सामना रंगात आला होता. मैदानात तुफान जल्लोष सूरू होता, आणि प्रेक्षकांकडून टाळ्यांचा गडगडाट सूरू होता. या सगळ्यात सामन्यात उत्साह असताना उत्कर्ष देसाई अचानक मैदानावर कोसळतो. उत्कर्ष देसाईला मैदानावर पडताना पाहून एकाएकी मैदानात शांतता पसरते.
advertisement
उत्कर्ष देसाई पडताच त्याचे मित्र त्याला काय झालं हे बघायला त्याच्याजवळ पोहोचले. यावेळी उत्कर्ष देसाई बेशुद्धा अवस्थेत पडला होता. त्यामुळे त्याला त्याच्या मित्रांनी तत्काळ उचलून गारगोटी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.पण उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, मैदानावर खेळत असतान त्याला हार्टअटॅक आला होता, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
advertisement
दरम्यान उत्कर्ष देसाई हा मुलगा बिंद्री येथील दूध सागर विद्यालयात बारावी विज्ञान शाखेत शिकत होता. त्याच्या या अकस्मात निधनाने देसाई कुटुंबियावर आणि पाटगावावर शोककळा पसरली आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Dec 31, 2025 8:34 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
क्रिकेट खेळता खेळता अचानक मैदानावर कोसळला, रुग्णालयात दाखल करताच कुटुंबियांनी हंबरडा फोडला, काय घडलं?










