Farmer ID : शेतकरी ओळखपत्र अनिवार्य, शेतकऱ्यांना कोण कोणते फायदे मिळणार? वाचा सविस्तर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Farmer ID Benefits : शेतकरी ओळखपत्रामुळे भविष्यात शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल. मग आता हे शेतकरी ओळखपत्र काय आहे त्याचे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार हेच आपण जाणून घेणार आहोत?
मुंबई : डिजिटल कृषी अभियानांतर्गत, देशातील अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांसाठी शेतकरी ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, आसाम, ओडिशा या राज्यांचा समावेश आहेत. शेतकरी आयडी हा अॅग्री स्टॅक प्लॅटफॉर्मचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो शेतकऱ्यांची ओळख सुरक्षित करण्यात आणि त्यांना सरकारी सेवांमध्ये प्रवेश प्रदान करण्यात मदत करेल. हे ओळखपत्र मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा कुटुंब ओळखपत्र आणि जमिनीशी संबंधित माहिती द्यावी लागेल. शेतकरी ओळखपत्रामुळे भविष्यात शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल. मग आता हे शेतकरी ओळखपत्र काय आहे? त्याचे शेतकऱ्यांना कोणते फायदे मिळणार? हेच आपण जाणून घेणार आहोत
शेतकरी ओळखपत्र म्हणजे काय?
शेतकरी ओळखपत्र ही शेतकऱ्यांची आधार कार्ड-आधारित अद्वितीय डिजिटल ओळखपत्र आहे जी राज्य भूमी अभिलेख प्रणालीशी सक्रियपणे जोडलेली आहे, म्हणजेच शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदींमध्ये बदल झाल्यावर शेतकरी ओळखपत्र आपोआप अपडेट होईल. या ओळखपत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योजनांचा लाभ घेता येणार आहे.
शेतकरी ओळखपत्राचे फायदे काय आहेत?
1) शेतकरी ओळखपत्र हे कृषी क्षेत्राच्या डिजिटल परिवर्तनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
advertisement
2) शेतकरी ओळखपत्र हे शेतकऱ्यांची पडताळणी पात्रता स्थापित करते. यामुळे शेतकऱ्यांना वारंवार केवायसी करण्याच्या त्रासातून मुक्तता मिळण्याची अपेक्षा आहे.
3) शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी केल्यानंतरच, भविष्यात शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
4) शेतकरी नोंदणीनंतर, शेतकऱ्यांना डिजिटल ओळखपत्र मिळेल.
5) शेतकरी ओळखपत्राद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी चांगल्या योजना आखता येणार आहेत.
advertisement
6) शेतकरी ओळखपत्र असल्यास बँकेकडून कर्ज घेण्यास मदत होऊ शकणार आहे.
7) खते, बियाणे आणि कृषी उपकरणे खरेदी करण्यासाठी अनुदानाची सुविधा दिली जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 30, 2025 11:56 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
Farmer ID : शेतकरी ओळखपत्र अनिवार्य, शेतकऱ्यांना कोण कोणते फायदे मिळणार? वाचा सविस्तर