एक एकर नापीक रान, सोलापुरातून रोपं आणली अन् इंजिनीअर तरुणानं शेतीत क्रांती घडवली, करतोय १८ लाखांची कमाई
- Published by:Ajit Bhabad
 
Last Updated:
Agriculture News : सध्या अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी शोधत असतात. आणि हेच आपलं सुखी जीवन म्हणून समाधान मानत असतात.मात्र काही ध्येयवेडे तरुण तरुणी आपल्याला काही तरी इतरांपेक्षा वेगळं करायचे आहे. या दृष्टीने विचार करत असतात.
मुंबई : सध्या अनेक तरुण उच्च शिक्षण घेऊन मोठ्या पगाराची नोकरी शोधत असतात. आणि हेच आपलं सुखी जीवन म्हणून समाधान मानत असतात.मात्र काही ध्येयवेडे तरुण तरुणी आपल्याला काही तरी इतरांपेक्षा वेगळं करायचे आहे. या दृष्टीने विचार करत असतात.त्यात त्यांना यशही मिळत असते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उच्च शिक्षित तरुणाची यशोगाथा सांगणार आहोत.ज्याने शेतीलाच आपलं करिअर मानलं असून त्यातून लाखो रुपयांची कमाई करत आहे.
अंशुल मिश्रा असं या तरुण शेतकऱ्याचे नाव असून तो उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. चेन्नईमध्ये संगणक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना, अंशुल मनात एक वेगळे स्वप्न आकार घेत होते. आधुनिक करिअरच्या शर्यतीत हे स्वप्न दुर्मिळ वाटत असले तरी अंशुलने ते वास्तवात उतरवले.
२०१८मध्ये घेतला निर्णय
२०१८ मध्ये अंशुल आपल्या पश्चिम उत्तर प्रदेशातील चिलौआ गावात परतला. त्याच्याकडे केवळ एक एकर नापीक जमीन आणि काही प्रयोगशील कल्पना होत्या. “त्या जमिनीवर वर्षानुवर्षे कुठलेही पीक घेतले नव्हते, मुलं तेथे क्रिकेट खेळायची,” पण त्याने ती जमीन नव्या उमेदीने जिवंत करण्याचा निर्धार केला.
advertisement
नापीक जमिनीवर शेतीचे पुनरुज्जीवन
अंशुलने जमिनीत शेणखत टाकून माती सुधारली आणि हरभरासारखी नायट्रोजन वाढवणारी पिके घेतली. त्याने नैसर्गिक खत आणि पारंपरिक शेती तंत्रांचा वापर करून जमिनीचा सुपीकपणा वाढवला. काही महिन्यांतच त्याला जाणवले की जमीन आता उत्पादनक्षम झाली आहे.
ड्रॅगन फळ शेतीचा प्रयोग
नवीन पिकांचा शोध घेत असताना, अंशुलला YouTube वर ड्रॅगन फळ शेतीबद्दल माहिती मिळाली. “हे एकदाच गुंतवणूक करून वर्षभरात सात वेळा फळ देणारे पीक आहे,” असंही तो सांगतो. गहू आणि भाताच्या पारंपरिक शेतीतून बाहेर पडून, अंशुलने ड्रॅगन फळ लागवडीचा निर्णय घेतला.
advertisement
त्याने महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातून १,६०० रोपे आणली आणि आपल्या एक एकर जमिनीवर लागवड केली. १८ महिन्यांतच पहिले फळ आले आणि अंशुलचा प्रयोग यशस्वी ठरला. सहा वर्षांत त्याने शेतीचा विस्तार पाच एकरांपर्यंत केला आणि आता तो ड्रॅगन फळांची लागवड व रोपवाटिका दोन्ही चालवतो.
मोठा नफा आणि स्थिर उत्पन्न
प्रति एकर २५ ते ३० क्विंटल उत्पादन मिळते आणि फळांचा बाजारभाव सुमारे २५० रुपये किलो आहे. यामुळे अंशुलला प्रति एकर ४-५ लाख रुपयांपर्यंत नफा मिळतो. त्याशिवाय रोपवाटिकेमधून दरवर्षी सुमारे १८ लाख रुपयांचे अतिरिक्त उत्पन्न मिळते.
advertisement
‘चिलौआ मॉडेल’ बहुस्तरीय शेतीचा नवा प्रयोग
अंशुलने जागेचा जास्तीत जास्त उपयोग करण्यासाठी “भिंतीवर शेती” हा इस्रायली पद्धतीचा वापर केला. भिंतींवर, जमिनीवर आणि टेरेसवर ड्रॅगन फळे लावून त्याने “चिलौआ मॉडेल” विकसित केले. या पद्धतीत जाड प्लास्टिक पाइपचा वापर कुंडी म्हणून केला जातो आणि प्रत्येक पाइपमध्ये दोन रोपे लावली जातात. त्यामुळे मर्यादित जागेत अधिक उत्पादन मिळते.
advertisement
पाणी व्यवस्थापन आणि हवामानाशी जुळवून घेतलं
ड्रॅगन फळासाठी पाण्याची गरज कमी असते. अंशुल ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये दर २० दिवसांनी, डिसेंबर-जनुवारीत दर ३० दिवसांनी आणि उन्हाळ्यात आठवड्यातून तीन वेळा पाणी देतो. पावसाळ्यात सिंचनाची गरज नसते. हे पीक १० ते ४० अंश तापमान सहज सहन करते आणि मे ते डिसेंबर दरम्यान दर ४५ दिवसांनी फळ देते.
advertisement
स्थानिक बाजारपेठेत ‘ड्रॅगन फळ’ची ओळख
अंशुलने शाहजहानपूर, बरेली, फारुखाबाद आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये ड्रॅगन फळांची विक्री वाढवली आहे. “हे फळ आता ग्रामीण भागात भेटवस्तू म्हणून लोकप्रिय झाले आहे,” असेही तो सांगतो. पंचायत सदस्यांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांपर्यंत अनेकजण हे फळ भेट म्हणून वापरतात.
युवा शेतकऱ्यांसाठी बनला प्रेरणा
view commentsदरम्यान, अंशुल मिश्रा ग्रामीण नवकल्पनेचा आदर्श बनला आहे. अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेला हा युवक आज ड्रॅगन फळ शेतीतून लाखोंचा नफा मिळवत आहे आणि त्याचे ‘चिलौआ मॉडेल’ ग्रामीण भारतासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 7:37 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
एक एकर नापीक रान, सोलापुरातून रोपं आणली अन् इंजिनीअर तरुणानं शेतीत क्रांती घडवली, करतोय १८ लाखांची कमाई


