Dombivli-Thane Bus: डोंबिवली- ठाणे प्रवास करण्यासाठी लोकलची कटकट गेली, कधीपासून सुरू होतेय बस; किती असेल भाडे?
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
डोंबिवली- ठाणे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं आता टेन्शन कमी होणार आहे. केडीएमसी आणि टीएमसीकडून या मार्गावर पहिल्यांदाच बससेवा सुरू करण्यात येणार आहे.
डोंबिवली: डोंबिवली- ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी आहे. आता डोंबिवलीकरांचा प्रवास आणखीनच सुखकर होणार आहे. लोकल प्रवासातून होणारी कटकट आता कमी होणार आहे. डोंबिवलीहून ठाण्याकडे जाणाऱ्या प्रवासांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक प्रवासी ठाण्यापर्यंत लटकून प्रवास करत असतात. लोकलचा प्रवास करत असताना अनेक प्रवाश्यांचा लोकलमधून पडून जीव सुद्धा जातो. सध्या लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याची संख्या अलीकडच्या दिवसांमध्ये वाढत चालली आहे. या मुद्द्यावर आता केडीएमसी आणि टीएमसीने पर्याय काढला आहे.
बस केव्हापासून सुरू होणार?
डोंबिवलीकरांना ठाण्याला जाण्यासाठी लोकलच्या गर्दीतून जाण्याची एक टेन्शन कमी होणार आहे. केडीएमसी आणि टीएमसीकडून या मार्गावर पहिल्यांदाच बससेवा सुरू करण्यात येणार आहे. येत्या 4 मार्चपासून या बससेवेला सुरूवात होणार असून सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेमध्ये विशेषत: ही सेवा प्रवाशांना पुरवली जाणार आहे. येत्या 4 मार्चपासून 40 सीटांच्या दोन बसेस डोंबिवलीकरांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत. पीक अव्हरच्या काळामध्ये, प्रत्येकी 4 म्हणजेच एकूण 8 बस फेऱ्या सुरू होणार आहेत. यामुळे नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. धक्काबुक्कीच्या प्रवासातून नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
advertisement
बसचा मार्ग कसा असेल?
डोंबिवली- ठाणे बससेवा ही, डोंबिवलीच्या मोठागाव सर्कलपासून ठाण्याच्या घोडबंदर रोडपर्यंत धावणार आहे. मोठागाववरून सुरू झालेली बससेवा मोठागाव- मानकोली पूल, मानकोली आणि माजिवाडा चौक असा या बसचा मार्ग असणार आहे. त्यामुळे डोंबिवलीवरून ठाण्याला प्रवास करणाऱ्यांना फायदा होणार आहे, अशी आशा व्यक्त केली जात आहे. स्वामी नारायण सिटी ते माजीवडा जंक्शनचं 14 किमी अंतर 55 मिनिटामध्ये बस पार करेल. स्वामी नारायण सिटीवरून पहिली बस सकाळी 07:15 वाजता सुटेल आणि शेवटची बस संध्याकाळी 06:45 वाजता सुटेल. त्या संपूर्ण काळात तासाला एक फेरी सुटेल. माजीवडावरून सकाळी 08:15 वाजता पहिली आणि संध्याकाळी 08:15 वाजता शेवटची बस सुटेल. त्या काळात तेथूनही प्रत्येक तासाला बस सुटेल. कमाल भाडे 5 आणि किमान 20 रुपये असेल.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 3:19 PM IST
मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Dombivli-Thane Bus: डोंबिवली- ठाणे प्रवास करण्यासाठी लोकलची कटकट गेली, कधीपासून सुरू होतेय बस; किती असेल भाडे?









