इराण-अमेरिका युद्धामुळे महागाईचा 'बॉम्ब' फुटला, चांदी २५ हजारांनी महागली, सोनं कितीनं महागलं?
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Gold Silver Rate Jalgaon : अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्या-चांदीच्या दरांनी आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी, जळगाव: जागतिक राजकारणातील वाढत्या तणावाचा थेट फटका आता सर्वसामान्यांच्या खिशाला बसला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे सोन्या-चांदीच्या दरांनी आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. मागील २४ तासात सोनं-चांदीच्या मोठी वाढ झाली आहे.
सोनं पावणे दोन लाखांवर, चांदी ३ लाखांच्या पार
अवघ्या २४ तासांत सोन्याच्या दरात ११ हजार रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल २५ हजार रुपयांची ऐतिहासिक वाढ झाली आहे. २०२६ वर्षाच्या सुरुवातीला सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले होते, त्यानंतर काही प्रमाणात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र, इराण-अमेरिका संघर्षाने पुन्हा एकदा बाजार पेटवला आहे. आज जीएसटीसह सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ७५ हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. तर चांदीने ३ लाख ३ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. एकाच दिवसात झालेली ही वाढ पाहून सराफा बाजारही चक्रावून गेला आहे.
advertisement
सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले
लग्नसराईचे दिवस जवळ येत असतानाच सोन्याच्या दरात झालेल्या या प्रचंड वाढीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. "युद्धजन्य परिस्थिती अशीच राहिली, तर सोन्याचे दर २ लाखांच्या पार जाऊ शकतात," असा अंदाज बाजार तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सुरक्षित गुंतवणूक म्हणून जगभरातील गुंतवणूकदार सोन्याकडे वळत असल्याने ही दरवाढ होत असल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
सोमवारी शेअर बाजारात काय होणार?
येत्या सोमवारपासून (२ मार्च) शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते. युद्धाचा भडका उडाला तर भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळू शकते. सोन्या-चांदीचे दर हे प्रामुख्याने युद्धाच्या बातम्या, अमेरिकन डॉलरची हालचाल आणि जागतिक बँड यील्डवर अवलंबून असतील. जर हा संघर्ष शांत झाला नाही, तर सामान्यांच्या खिशाला सोन्याच्या वाढत्या किमतींचा मोठा फटका बसणार आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
Mar 01, 2026 3:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/
इराण-अमेरिका युद्धामुळे महागाईचा 'बॉम्ब' फुटला, चांदी २५ हजारांनी महागली, सोनं कितीनं महागलं?










