advertisement

Onion Crop: सततचा पाऊस, शेतकऱ्याच्या स्वप्नाचा झाला चिखल, कांदा पिकाचे मोठे नुकसान, Video

Last Updated:

एकीकडे उच्च शिक्षण शिकूनही नोकरी मिळत नव्हती म्हणून राहुल यांनी शेती करायचा निर्णय घेतला होता. मात्र या पावसामुळे हाताशी आलेला कांदा खराब झाल्यामुळे तरुण शेतकरी राहुल शेळके यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले आहे.

+
News18

News18

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावातील शेतकरी राहुल शेळके यांनी एका एकरात कांद्याची लागवड केली होती, मात्र सोलापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे हाताला आलेला कांदा खराब झाला आहे. एकीकडे उच्च शिक्षण शिकूनही नोकरी मिळत नव्हती म्हणून राहुल यांनी शेती करायचा निर्णय घेतला होता. मात्र या पावसामुळे हाताशी आलेला कांदा खराब झाल्यामुळे तरुण शेतकरी राहुल शेळके यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे नुकसान झाले आहे.
हराळवाडी गावातील तरुण शेतकरी राहुल शेळके यांचे शिक्षण बी. फार्मसीपर्यंत झाले आहे. उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नसल्याने त्यांनी गावाकडे शेती करायचा निर्णय घेतला. एका एकरात राहुल शेळके यांनी कांद्याची लागवड केली होती. एका एकरात कांद्याची लागवड केली होती. कांदा लागवडीसाठी राहुल शेळके यांना 80 ते 1 लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता. परंतु या पावसामुळे कांद्याचे अतोनात नुकसान झाले असून तरुण शेतकरी राहुल शेळके यांचे जवळपास तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
advertisement
कांदा पिकाला कोणताही रोग पडू नये, कांदा खराब होऊ नये यासाठी राहुल शेळके यांनी पोटच्या मुलासारखं कांद्याला जपले होते. परंतु सोलापूर शहरात सुरू असलेल्या पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे संपूर्ण कांदा पीक हे जळून गेले आहे, तर आलेले कांदे हे पूर्णपणे खराब झाले आहेत. सरकारने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी तरुण शेतकरी राहुल शेळके यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Onion Crop: सततचा पाऊस, शेतकऱ्याच्या स्वप्नाचा झाला चिखल, कांदा पिकाचे मोठे नुकसान, Video
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement