advertisement

Success Story: 4 वर्षांपूर्वी केली सुरूवात, वडापाव विक्रीतून तरुण कमवतोय महिन्याला 2 लाख, सांगितला सक्सेस मंत्रा

Last Updated:

या नाष्टा सेंटरच्या माध्यमातून तागडे यांची दररोज 30 हजार रुपयांपर्यंत उलाढाल होत असते, तसेच महिन्यासाठी खर्च वजा निव्वळ नफा दीड ते 2 लाख रुपयांपर्यंत मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय.

+
News18

News18

छत्रपती संभाजीनगर : तालुक्यातील पैठण रोडवरील गेवराई येथे गणेश तागडे हा तरुण 4 वर्षांपासून नाश्ता सेंटर चालवत आहे. विघ्नहर्ता आप्पा वडेवाले म्हणून या नाश्ता सेंटरचे नाव असून त्यांच्याकडे वडापाव, मिसळपाव, भजी यासह विविध प्रकारचे पदार्थ मिळतात. पैठण, चितेगाव यासह विविध भागातून खवय्ये त्यांच्याकडे नाश्त्यासाठी येत असतात. त्यामुळे 1 हजार ते बाराशे वडापाव दररोज विक्री होतात. या नाष्टा सेंटरच्या माध्यमातून तागडे यांची दररोज 30 हजार रुपयांपर्यंत उलाढाल होत असते, तसेच महिन्यासाठी खर्च वजा निव्वळ नफा दीड ते 2 लाख रुपयांपर्यंत मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय.
आधीपासून वडापाव सेंटर हे वडील शाम तागडे चालवतात. खरंतर हा वडिलांचा व्यवसाय आहे. लॉकडाउनच्या अगोदर माझ्याकडे पाणी बॉक्स एजन्सी होती. मात्र कोरोना काळात रोजगार गेला. नाश्ता सेंटर ही बंद होते मात्र नंतरच्या काळात व्यवसाय सुरू करून वेळेनुसार बदल केले. पैठण रोडवरील गेवराई येथे वडापाव नाश्ता सेंटर सुरू झाले. सध्या वडापाव, ब्रेडवडा, चहा, भजी यासह विविध प्रकारचा नाश्ता उपलब्ध आहे. तसेच हे नाश्ता सेंटर चालवण्यासाठी कुटुंबातील सर्वजण मदत करतात. भाऊ, वडील त्यामुळे सोपे जात असून 2 लाख रुपयांपर्यंत या माध्यमातून कमाई होत असल्याचं देखील तागडे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
तरुणांनी व्यवसायात येण्याअगोदर काय करावे?
नवीन क्षेत्रात येण्याअगोदर त्यातले ज्ञान असणे हे महत्त्वाचे आहे. छोटे नाश्ता सेंटर सुरू केले तरी त्यामध्ये पदार्थ कोणते ठेवायचे, त्याची चव कशी असली पाहिजे, ग्राहकांना काय आवडते अशा बारीक गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी अनुभव सुद्धा तितकाच लागतो. मिसळसाठी लागणारे मसाल्यांपैकी हळद ही बाहेरची वापरली जाते तर बाकीचे सर्व वडापाव, ब्रेडवडा यासाठी घरगुती बनवलेले मसाले वापरले जाते. तसेच चांगल्या दर्जाचे बेसन पीठ, तेल वापरायचे जेणेकरून सर्व पदार्थ कमी तेलकट निघतात आणि ते ग्राहकांनाही आवडतात त्यामुळे या ठिकाणी कायम गर्दी असते.
advertisement
नवीन व्यवसाय सुरू करायचा तर खर्च किती?
तागडे यांनी छोट्या पिक अप गाडीत नाश्ता सेंटर सुरू केले आहे. त्यामध्ये पाण्याच्या टाकीसाठी स्वतंत्र जागा, तसेच खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी वेगळी जागा, तसेच सर्व पदार्थ बनवण्यासाठी त्यामध्येच जागा केलेली आहे. रात्रीच्या वेळी लाईटची आवश्यकता असते त्यामुळे इन्व्हर्टर बसवण्यात आलेले आहे. साधारणपणे या गाडीला अडीच ते 3 लाख रुपये खर्च आला आहे. तसेच बाकीचे सर्व पदार्थ तुमच्या नियोजनानुसार घेऊ शकता. या गोष्टी नवीन व्यवसायात येण्यासाठी आवश्यक आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story: 4 वर्षांपूर्वी केली सुरूवात, वडापाव विक्रीतून तरुण कमवतोय महिन्याला 2 लाख, सांगितला सक्सेस मंत्रा
Next Article
advertisement
Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement