Goat Farming : शेळीपालन सुरू करण्याच्या विचारात आहात का? जातीवंत शेळी कशी निवडायची? जाणून घ्या
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Goat Farming : शेळीपालनात यशस्वी होण्यासाठी योग्य जातींची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. उत्पादनाचा उद्देश मांस किंवा दूध स्पष्ट असल्यास योग्य शेळी आणि बोकड निवडणे सोपे होते आणि यामुळे उत्पन्नात मोठी वाढही साधता येते.
मुंबई: शेळीपालनात यशस्वी होण्यासाठी योग्य जातींची निवड अत्यंत महत्त्वाची आहे. उत्पादनाचा उद्देश मांस किंवा दूध स्पष्ट असल्यास योग्य शेळी आणि बोकड निवडणे सोपे होते आणि यामुळे उत्पन्नात मोठी वाढही साधता येते.
जातींची निवड कशासाठी करायची हे आधी ठरवा
मांस उत्पादनासाठी - अशा शेळ्यांची निवड करा ज्या अधिक वजनाची करडे देतात, एका वेतात दोन किंवा अधिक करडे जन्माला घालतात आणि जलद गतीने वजन वाढवतात.
दुग्ध उत्पादनासाठी - निरोगी आणि भरपूर दूध देणाऱ्या शेळ्यांची निवड करावी.
शेळ्यांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी?
पशुतज्ज्ञांचा सल्ला घ्या - शेळ्या विकत घेण्यापूर्वी तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे अत्यावश्यक आहे.
advertisement
जुळी करडे देणारी शेळी निवडा - पूर्वी वेत झालेली, दोन किंवा अधिक करडे देणारी शेळी उत्पादनासाठी फायदेशीर ठरते.
दूध देणाऱ्या शेळ्यांचे निकष काय असावे?
शेळ्यांचे वय 1 ते 2 वर्षे असावे तसेच दातांची संख्या 2 ते 4 दात अशी असावी. कासेची स्वच्छता आणि दुधाचे प्रमाण कासेवर सूज कडकपणा किंवा संसर्ग नसावा. शेळी सशक्त, चपळ आणि शांत स्वभावाची असावी.शरीराचा बांधा मोठा, सरळ आणि लांबी तोंडापासून शेपटीपर्यंत समतोल असावा.केस मऊ,घन आणि चमकदार असावेत तसेच तिचे करडे आरोग्यदायक, चैतन्यशील आणि परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 10, 2025 1:02 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Goat Farming : शेळीपालन सुरू करण्याच्या विचारात आहात का? जातीवंत शेळी कशी निवडायची? जाणून घ्या








