Mango Rate: फळांचा राजा बाजारात दाखल, पाडव्याच्या मुहूर्तावर किती मिळतोय दर?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
Mango Rate: फळांचा राजा गुढीपाडवा सणाच्या पूर्वी बाजारात दाखल झाला आहे. आंध्रप्रदेश, कर्नाटकातून आलेल्या आंब्याला किती दर मिळतोय जाणून घेऊ.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: फळांचा राजा आंबा गुढीपाडव्या आधीच बाजारात दाखल झाला आहे. राज्यातील जालना बाजार समितीमध्ये केशर, दशहरी, लालबाग आणि पदान या चार प्रकारच्या आंब्याची आवक सुरू झाली आहे. सध्या बाजारात आंब्यांची आवक मर्यादित असून यामुळे दर देखील दीडशे ते दोनशे रुपये प्रति किलोपर्यंत आहेत. परंतु आगामी काळामध्ये गुढीपाडव्यानंतर आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढणार असून दर देखील कमी होतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. जालना बाजार समिती मधून आंब्यांच्या दरांबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला आंब्याचे विविध प्रकार बाजारात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्याने केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा तसेच कर्नाटक या राज्यांमधून महाराष्ट्रात आंब्यांची आवक होत आहे. सध्या आंब्यांची आवक मर्यादित असल्याने दर देखील तेजीत आहेत. केसर आंबा हा 200 ते 225 रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जात आहे. तर लालबाग 150 ते 180 रुपये प्रति किलो या दराने विक्री होत आहे. आंध्रप्रदेश मधून केसर आणि बदाम या दोन व्हरायटी येत आहेत. त्याचबरोबर दशहरी आंबा देखील आंध्र प्रदेशातून येत आहे. दर सध्या महाग असून हळूहळू ते कमी होतील, असं व्यापाऱ्यांनी सांगितलं.ॉ
advertisement
हापूसची वाट पाहावी लागणार
सध्या बाजारात दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, कर्नाटकमधील आंबे मिळत आहेत. कोकणचा हापूस बाजारात आला असला तरी मोठ्या प्रमाणात आवक होण्यासाठी वाट पाहावी लागेल. त्यातच यंदा कोकणच्या हापूसचे हवामानातील बदलांमुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे हापूसचे दर देखील तेजीत राहतील, असंही व्यापाऱ्यांनी सांगितलं.
advertisement
असे आहेत आंब्यांचे दर
जालना बाजारामध्ये केसर आंबा 200 ते 220 रुपये प्रति किलो, लालबाग आंबा 150 ते 180 रुपये प्रति किलो, बदाम आंबा 150 रुपये प्रति किलो, तर दशहरी आंबा 130 रुपये प्रति किलो आहे. तर आणखी महिनाभराने गुजरातचा प्रसिद्ध केसर आंबा दाखल होईल. या आंब्याची गुणवत्ता उत्तम असल्याने महाराष्ट्रात गुजरातच्या केसरला मोठी मागणी असते. गुढीपाडव्यापासून अनेक लोक आंबे चाखायला सुरुवात करतात. त्यामुळे गुढीपाडव्यानंतर आंब्याची आवक देखील वाढणार असून दर देखील कमी होतील, असे व्यापारी अब्दुल मुक्तदिर यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
March 28, 2025 11:32 AM IST