advertisement

Krushi Market Rate: डाळिंबाला मिळालेल्या भावाने शेतकरी सुखावला, नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दमदार दर

Last Updated:

शुक्रवार, दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.

+
Krushi

Krushi Market Rate: डाळिंबाला मिळालेल्या भावाने शेतकरी सुखावला, नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दमदार दर

मुंबई: शुक्रवार, दिनांक 2 जानेवारी 2026 रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये गुळ, शेवगा आणि डाळिंबाची आवक व भाव पाहू.
गुळाच्या आवकेत सुधारणा: राज्याच्या मार्केटमध्ये आज एकूण 3544 क्विंटल गुळाची आवक झाली. यापैकी सांगली बाजारात 2021 क्विंटल सर्वाधिक आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3350 ते 4150 रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 369 क्विंटल गुळास 5450 रुपये सर्वाधिक सर्वसाधारण बाजारभाव मिळाला.
शेवग्याची आवक कमीच: राज्याच्या मार्केटमध्ये आज 167 क्विंटल शेवग्याची आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये सर्वाधिक 163 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 1600 ते 2400 रुपये दरम्यान सर्वात कमी बाजारभाव मिळाला. तसेच ठाणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल शेवग्यास 17000 रुपयांपर्यंत बाजारभाव सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
advertisement
डाळिंबाचे भाव: आज राज्याच्या मार्केटमध्ये 1409 क्विंटल डाळिंबाची एकूण आवक झाली. यापैकी 836 क्विंटल सर्वाधिक आवक नागपूर मार्केटमध्ये राहिली. त्यास सर्वसाधारण 5000 रुपये बाजारभाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 8 क्विंटल डाळिंबास प्रतीनुसार 150000 रुपयांपर्यंत सर्वाधिक बाजारभाव मिळाला.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Krushi Market Rate: डाळिंबाला मिळालेल्या भावाने शेतकरी सुखावला, नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दमदार दर
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement