आता आली लाल ज्वारी, नवीन वाणाची निर्मिती, अशी करा लागवड Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
फुले रोहिणी असे या ज्वारीच्या वाणाचे नाव आहे. फुले रोहिणी हा ज्वारीचा दिसायला लाल रंग आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असणाऱ्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि संशोधन केंद्र येथे ज्वारीमध्ये नवीन वाण विकसित करण्यात आले आहे. फुले रोहिणी असे या ज्वारीच्या वाणाचे नाव आहे. फुले रोहिणी हा ज्वारीचा दिसायला लाल रंग आहे. या फुले रोहिणी ज्वारीच्या वाण संदर्भात अधिक माहिती डॉ. व्ही. आर. पाटील असिस्टंट प्रोफेसर महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि संशोधन केंद्र मोहोळ येथील संशोधन केंद्रात कोरडवाहू रब्बी ज्वारीसाठी काम केले जाते. या संशोधन केंद्रात फुले रोहिणी या ज्वारीच्या वाणाची निर्मिती करण्यात आली आहे. या ज्वारीचा दिसायला लाल रंग आहे. फुले रोहिणी ज्वारीच्या पिठापासून उत्कृष्ट दर्जेचे पापड तयार होतात. हा पापड उद्योगासाठी उत्कृष्ट वाण आहे.
advertisement
रब्बी हंगामात 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये फुले रोहिणी वाणाची लागवड केली जाते. ज्याप्रमाणे आपण रब्बी ज्वारीची लागवड केली जाते त्याचप्रमाणे या फुले रोहिणीची लागवड करायची आहे. फुले रोहिणीची लागवड 45 बाय 15 सेमीवर याची लागवड करायची आहे. हा वाण कोरडवाहू असल्यामुळे पाण्याखाली पण येतं पण हा वाण कोरडवाहूसाठी तयार केला आहे म्हणून आव्हान उत्कृष्ट पद्धतीने येतो.
advertisement
फुले रोहिणी हा वाण पापड उद्योग करण्यासाठी उत्कृष्ट आहे. म्हणून या वाणाची लागवड करण्या अगोदर पापड उद्योजक किंवा पापड व्यवसायिक शोधून शेतकऱ्यांनी याची लागवड करावी. ज्या वेळेस शेतकऱ्याला पापड व्यवसाय किंवा उद्योजक सापडेल तेव्हाच त्यांनी या फुले रोहिणी वाणाची लागवड आपल्या शेतात करावी.
शेतकऱ्यांनी पापड व्यवसायिक किंवा पापड उद्योजक शोधून या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना या फुले रोहिणी वाणापासून नक्कीच उत्पन्न चांगल मिळेल, असा सल्ला महात्मा फुले कृषी विद्यापीठ कृषि संशोधन केंद्र मोहोळ येथील डॉ. व्ही. आर. पाटील असिस्टंट प्रोफेसर यांनी दिला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
February 06, 2025 6:21 PM IST