40 कोंबड्यापासून केली व्यवसायाला सुरुवात, आता महिन्याकाठी 2 लाखापर्यंतची उलाढाल, शेतकऱ्याचं यशस्वी कुक्कुटपालन!

Last Updated:

सुरुवातीला शशिकांत यांनी आठवडा बाजारातून 40 पक्षी आपल्या घरी आणले. कोंबड्या जास्तीत जास्त कसे वाढवता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केल्यानंतर आज शशिकांत यांनी 60 हजार कोंबड्यांचे मल्हारबाग गावरान पोल्ट्री उद्योग उभारला आहे.

+
News18

News18

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी 
नाशिक : भारतीय शेतकरी पूर्वपरंपरेपासून शेती करत असताना त्यासोबत अनेक प्रकारची जोडधंदे करत आलेला आहे. यामध्ये पशुपालन, शेळीपालन, मेंढी पालन आणि कुक्कुटपालन या व्यवसायांचा समावेश देखील मोठ्या प्रमाणात आता केला जात आहे. जसे शेती प्रगत होत गेली तसे तसे शेती व्यवसायाला पूरक असलेले धंदे देखील विकसित होत गेले. प्रत्येक व्यवसायाला आता व्यावसायिक दृष्टिकोनातून बघितले जात असून त्या दृष्टीने त्यामध्ये प्रयत्न केले जात आहेत. अशाच पद्धतीने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील गौळवाडी गावातील शेतकरी शशिकांत राऊत यांनी देखील शेतीला जोडधंदा म्हणून देशी प्रजातीच्या कोंबड्यांचे पालन सुरू केले आहे.
advertisement
शशिकांत यांना लहानपणापासून कुक्कुटपालन करायला आवडत होते. त्यामुळे त्यांना या कोंबड्यांविषयी माहिती असल्याने कुक्कुटपालन हा व्यवसाय 3 वर्षांपूर्वी सुरू केला. सुरुवातीला शशिकांत यांनी आठवडा बाजारातून 40 पक्षी आपल्या घरी आणले. त्यांची संपूर्ण व्यावसायिक क्षेत्रातील माहिती समजून घेतली. कोंबड्या जास्तीत जास्त कसे वाढवता येईल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केल्यानंतर आज शशिकांत यांनी 60 हजार कोंबड्यांचे मल्हारबाग गावरान पोल्ट्री उद्योग उभारला आहे.
advertisement
त्यांच्या या प्रवासात अनेक चढ-उतार देखील आले. जिवंत पक्षी म्हटल्यानंतर त्यांच्यावर रोग पडणे, पक्षी मरण पावणे अशा अनेक अडचणींना सामोरे जात शशिकांत यांनी 40 कोंबड्यांचे 60 हजार कोंबड्या केल्या. आज या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांची महिन्याकाठी 2 लाखापर्यंतची उलाढाल ही होत असते. तसेच यांनी आपले ग्राहक देखील नाशिक, पुणे, नगर, सापुतारा, गुजरात या ठिकाणी वाढविले आहे आणि त्यांच्या मल्हारबाग पोल्ट्रीचे नाव पोहोचविले आहे.
advertisement
शशिकांत या कोंबड्यांच्या माध्यमातून रोजचे साधारण 1200 ते 1500 अंडी घेत असतात. तसेच आधुनिक यंत्रणेचा वापर करून देखील या अंड्यातून नवीन कोंबडीचे पिल्लू निर्माण करून विक्री करीत असतात. 1 दिवसाच्या कोंबडीची किंमत 50 ते 60 रुपये तसेच मोठी कोंबडी ही जागेवर 400 किलोने ही विक्री करीत असतात.
तसेच शशिकांत हे त्यांच्या मल्हारबाग युट्युब चॅनलच्या माध्यमातून तरुणांना व्यवसायाबद्दल देखील मार्गदर्शन करीत असतात. तुम्हाला देखील या व्यवसायाची सुरुवात करण्याची इच्छा असल्यास तुम्ही देखील यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकणार आहात.
advertisement
मराठी बातम्या/कृषी/
40 कोंबड्यापासून केली व्यवसायाला सुरुवात, आता महिन्याकाठी 2 लाखापर्यंतची उलाढाल, शेतकऱ्याचं यशस्वी कुक्कुटपालन!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement