advertisement

WPL 2026 च्या फायनलमध्ये दोन मैत्रिणी भिडणार, एलिमिनेटरमध्ये जेमीमाच्या दिल्लीने गुजरातचा धुव्वा उडवला

Last Updated:

वुमेन्स प्रिमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात कर्णधार जेमीमा रॉड्रीग्जच्या दिल्ली कॅपिटल्सने 7 विकेट राखून गुजरात जाएटसचा पराभव केला आहे. या विजयासह जेमीमाचा दिल्ली संघ फायनलमध्ये पोहोचला आहे

wpl 2026 delhi capital
wpl 2026 delhi capital
Gujarat Giants Women vs Delhi Capitals Women, Eliminator, WPL 2026 : वुमेन्स प्रिमियर लीगच्या एलिमिनेटर सामन्यात कर्णधार जेमीमा रॉड्रीग्जच्या दिल्ली कॅपिटल्सने 7 विकेट राखून गुजरात जाएटसचा पराभव केला आहे. या विजयासह जेमीमाचा दिल्ली संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. विशेष म्हणजे दिल्ली कॅपिटल चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. आता फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा सामना स्मृती मानधनाच्या रॉयल चँलेजर्सं बंगळुरूशी होणार आहे. त्यामुळे दोन मैत्रिणींमध्ये वुमेन्स प्रिमियर लीगचा फायनल सामना रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.
गुजरात जाएटसने दिल्ली कॅपिटल्ससमोर 168 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सची सूरूवात चांगली झाली होती. दिल्लीकडून लीझेले ली आणि शेफाली वर्मा सलामीला उतरले होते. यावेळी लिझेले लीने 43 धावांची खेळी केली.शेफाली वर्मा 31 धावा करून बाद झाली. या दोन्ही खेळाडू बाद झाल्यानंतर कर्णधार जेमीमा रॉड्रीग्ज आणि लॉरा वोल्व्हार्ट मैदानात आली होती.यावेळी जेमीमाने 41 आणि लॉराने 28 धावांची खेळी करून संघाला सामना जिंकून दिला.अशाप्रकारे दिल्ली कॅपिटल्सने गुजरात जाएसच्या 7 विकेटने पराभव केला आहे. गुजरात जाएटसकडून जॉर्जिया वेरहामने 2 विकेट तर राजश्री गायकवाडने एक विकेट काढली होती.
advertisement
गुजरातच्या फलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या डावाची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण बेथ मुनी आणि सोफी डिवाईन फलंदाजीला उतरली होती. यावेळी सोफी डिवाईन 6 तिच्यानंतर अनुष्का शर्मा 16, अॅशले गार्डनर शुन्यावर आणि कनिका अहूजा 6 धावांवर बाद झाली होती.एकाबाजून हे विकेट पडत असताना बेथ मुनीने गुजरातचा डाव सावरला होता. त्यानंतर जॉर्जिया वेरहाने 35 धावांची खेळी केली आणि काश्वी गौतमने 18 धावा आणि बेथ मुनी 62 धावा करून नाबाद राहिली, या बळावर गुजरात जाएटनसने 168 धावा केल्या होत्या.
advertisement
दिल्ली कॅपिटल्सने हा आव्हान 7 विकेट राखून पूर्ण करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.दिल्ली कॅपिटल्सने चौथ्यांदा फानललमध्ये प्रवेश केला आहे. पण त्यांना एकदाही फायनल जिंकता आली नाही आहे.आता जेमीमा रॉड्रीग्जच्या नेतृत्वात तरी दिल्ली संघ फायनल जिंकतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
WPL 2026 च्या फायनलमध्ये दोन मैत्रिणी भिडणार, एलिमिनेटरमध्ये जेमीमाच्या दिल्लीने गुजरातचा धुव्वा उडवला
Next Article
advertisement
GK Quiz: गोव्यापेक्षा पाच पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो, 99% लोकांना नाव सांगता येणार नाही
गोव्यापेक्षा 5 पट छोटा देश, श्रीमंतीत जगाचा बाप; कमाईत अमेरिका, चीनला मागे टाकतो
  • गोव्यापेक्षाही लहान, पण खिशात अख्खं जग

  • एका शहराचा संपूर्ण देश कसा झाला?

  • 99% लोकांना देशाचं नाव सांगता येणार नाही

View All
advertisement