advertisement

Black Wheat Farming : शेतकऱ्यांनो! काळ्या गव्हाची पेरणी करून उत्तम कमाई करा

Last Updated:

Agriculture News : हिवाळी हंगामात शेतकरी गव्हाची पेरणी करून चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला काळ्या गव्हाच्या शेतीबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती

काळ्या गव्हाची शेती ठरतेय फायदेशीर
काळ्या गव्हाची शेती ठरतेय फायदेशीर
मुंबई : गहू, भात आणि ऊस यांसारखी पारंपारिक पिके भारतात फार पूर्वीपासून घेतली जात आहेत. सरकारने या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत म्हणजेच एमएसपी निश्चित केली आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची योग्य किंमत मिळू शकेल. पारंपारिक शेतीतून मिळणारा नफा मर्यादित राहतो, त्यामुळे बरेच शेतकरी आता नवीन पर्याय शोधत आहेत. लवकरच हिवाळ्याला सुरवात होणार आहे. हिवाळी हंगामात शेतकरी गव्हाची पेरणी करून चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु आज आम्ही तुम्हाला काळ्या गव्हाच्या शेतीबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर माहिती
काळा गहू हा सामान्य गव्हापेक्षा वेगळा आहे. त्यात प्रथिने, अँटिऑक्सिडंट्स, फायबर, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे महत्त्वाचे घटक मोठ्या प्रमाणात आढळतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा गहू विशेषतः फायदेशीर ठरतो. कारण त्यात ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. याशिवाय काळ्या गव्हामध्ये असलेले अँथोसायनिन नावाचे तत्व देखील कर्करोगाशी लढण्यासाठी महत्वाचे ठरते.
advertisement
पंजाबमधील मोहाली येथील नॅशनल ॲग्री-फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट (NABI) च्या शास्त्रज्ञांनी काळा गहू विकसित केला आहे. त्याचे मर्यादित उत्पादन आणि जास्त मागणी यामुळे त्याची बाजारभाव सामान्य गव्हापेक्षा अनेक पटींनी जास्त आहे, त्यामुळे त्याची लागवड शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरत आहे.
काळ्या गव्हाची पेरणी केव्हा व कशी करावी?
काळ्या गव्हाची लागवड प्रामुख्याने मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये केली जाते. या गव्हाच्या पेरणीसाठी सर्वात योग्य वेळ नोव्हेंबर आणि महिना आहे. तसेच तुम्ही डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुद्धा पेरणी करू शकतात. सामान्य गव्हाप्रमाणेच त्याची पेरणी केली जाते.
advertisement
दरम्यान, काळ्या गव्हाची पेरणी करण्याआधी शेतकऱ्यांना प्रमाणित संस्थांकडून योग्य बियाणे विकत घेणे आवश्यक असते. शेताची पूर्व तयारी ही सामान्य गव्हाप्रमाणेच केली जाते. तसेच पिकाची काढणी झाल्यानंतर योग्य पद्धतीने साठवण करणे गरजेचे असते. काळ्या गव्हाला मार्केटमध्ये मोठी मागणी आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा काळ्या गव्हाची शेती करून चांगले उत्पादन मिळवू शकतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Black Wheat Farming : शेतकऱ्यांनो! काळ्या गव्हाची पेरणी करून उत्तम कमाई करा
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement