सातबाऱ्यावर या नोंदी नसल्यास तुमचा जमीन मालकी हक्क ठरणार बेकायदेशीर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Satbara Utara : शेती किंवा नॉन-अग्रिकल्चर जमीन खरेदी करताना बरेच लोक केवळ स्थान, किंमत आणि विक्रेत्याच्या गोड शब्दांवर विश्वास ठेवून व्यवहार करतात. मात्र, जमिनीचा सातबारा उतारा तपासल्याशिवाय जमीन खरेदी करणे म्हणजे कायदेशीर फसवणूक ओढवून घेण्यासारखे आहे.
मुंबई : शेती किंवा नॉन-अग्रिकल्चर जमीन खरेदी करताना बरेच लोक केवळ स्थान, किंमत आणि विक्रेत्याच्या गोड शब्दांवर विश्वास ठेवून व्यवहार करतात. मात्र, जमिनीचा सातबारा उतारा तपासल्याशिवाय जमीन खरेदी करणे म्हणजे कायदेशीर फसवणूक ओढवून घेण्यासारखे आहे. या उताऱ्यात मालकी हक्क, वापराचा प्रकार, शासकीय अटी व हक्क यांची स्पष्ट नोंद असते. विशेषतः ‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ या नोंदी अत्यंत महत्त्वाच्या असतात. आणि याच नोंदींचा अभाव तुम्हाला भविष्यात जमीन गमवण्याच्या संकटात टाकू शकतो.
जमिनीचे कायदेशीर प्रकार
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 नुसार जमिनींचे तीन प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
जुनी शर्तीची जमीन (वर्ग 1)
खासगी मालकीची, कोणतीही परवानगी न लागणारी जमीन.
सातबाऱ्यावर ‘खा’ असा उल्लेख असतो.
नवीन शर्तीची जमीन (वर्ग 2)
वतन, इनाम, पुनर्वसन किंवा सरकारी अधिग्रहणानंतर दिलेली.
व्यवहार करण्यासाठी शासनाची अनिवार्य परवानगी आवश्यक.
सातबाऱ्यावर ‘शर्त लागू’ असा उल्लेख दिसतो.
advertisement
शासकीय पट्टेदार जमीन
सरकारकडून विशिष्ट वापरासाठी दिली जाते.
विक्री, भाडे किंवा हस्तांतरणासाठी कडक अटी असतात.
परवानगीशिवाय व्यवहार झाल्यास, जमीन जप्त होऊ शकते.
‘शर्त’ आणि ‘धारणप्रकार’ नसलेल्या सातबाऱ्याचा धोका काय?
जर सातबाऱ्यावर ‘शर्त’ किंवा ‘धारणप्रकार’ नमूद नसेल तर जमीन कोणत्या कायदेशीर नियमांतर्गत येते हे स्पष्ट होत नाही.व्यवहार बेकायदेशीर ठरू शकतो. शासन तुमच्याकडून शेअर वाटपाचा हक्क किंवा दंड वसूल करू शकते.व्यवहारावर न्यायालयीन स्थगन येऊ शकते
advertisement
भविष्यात जमीन रद्दबातल ठरवली जाऊ शकते.
जमिनीत व्यवहार करताना ‘ही’ खबरदारी घ्या
सातबाऱ्यावर ‘शर्त’ व ‘धारणप्रकार’ याची स्पष्ट नोंद आहे का, ते तपासा
जर सरकारी अट असेल, तर संबंधित अधिकाऱ्यांची लेखी परवानगी मिळाली आहे का?
विक्रेत्याजवळ सर्व वैध कागदपत्रे आणि मंजुरी आहेत का?
व्यवहार कायदेतज्ज्ञांकडून पडताळून घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 01, 2025 12:52 PM IST