advertisement

शेतकरी कर्जमाफी ते दिव्यांगांचे मानधनवाढ! पत्राद्वारे सरकारने काय आश्वासने दिली?

Last Updated:

Agriculture News : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी करत माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर आहेत.

agriculture news
agriculture news
अमरावती : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मागणी करत माजी राज्यमंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू गेल्या सहा दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनावर आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली असतानाही सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप वाढत आहे. अशातच आता राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट घेत शासनाचे आश्वासनांचे पत्र दिले आहे.
पत्रामध्ये सरकारकडून आश्वासन कोणती?
शेतकरी कर्जमाफीसाठी 15 दिवसांत उच्चस्तरीय समिती नेमली जाईल. थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांच्या वसुलीला स्थगिती देणे आणि नवीन कर्ज देणे याबाबतची बैठक लावून निर्णय घेण्यात येईल. दिव्यांगांच्या मानधनामध्ये 30 जूनच्या बजेटमध्ये वाढ करण्यात येईल.उर्वरित मुद्द्यावर बैठक लावून मागण्या निकाली काढल्या जातील.
बच्चू कडू काय म्हणाले?
यावर बच्चू कडू म्हणाले की, आम्ही शेतकरी आणि दिव्यांग बांधवांसाठी आंदोलन करत आहोत. शेतकरी हितासाठी सर्वपक्षातले मला साथ देत आहेत.शेतकरी आणि दिव्यांग या ठिकाणी बसून आंदोलन केले आहे. 1500 रुपयांमध्ये त्यांची गरज भागत नाही. 8 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नव्याने कर्ज घ्यावे. तोडगा निघाला नाहीतर आम्ही 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढू. आमची ताकद दाखवून देऊ असा इशारा देखील बच्चू कडू यांनी दिले आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेतकरी कर्जमाफी ते दिव्यांगांचे मानधनवाढ! पत्राद्वारे सरकारने काय आश्वासने दिली?
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement