TRENDING:

नवीन वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी सोयाबीन बाजारात मोठी उलथापालथ! दर कडाडले, आजचे भाव काय?

Last Updated:

Soyabean Bajar Bhav Update : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज ३ जानेवारी २०२६ रोजी सोयाबीनच्या दरांमध्ये संमिश्र स्थिती पाहायला मिळाली. काही बाजारांत दर स्थिर राहिले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
soyabean market
soyabean market
advertisement

मुंबई : राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये आज ३ जानेवारी २०२६ रोजी सोयाबीनच्या दरांमध्ये संमिश्र स्थिती पाहायला मिळाली. काही बाजारांत दर स्थिर राहिले, तर काही ठिकाणी आवक वाढल्याने दरांवर दबाव दिसून आला. एकूणच, सध्या सोयाबीनचे दरहजार तेहजार ३५० रुपयांच्या आसपास फिरताना दिसत असून, शेतकरी बाजारातील हालचालींकडे लक्ष ठेवून विक्रीचे निर्णय घेत आहेत.

advertisement

आजचा बाजार भाव काय?

जळगाव जिल्ह्यातील मसावत बाजार समितीत सोयाबीनची अत्यल्प आवक नोंदवली गेली. येथे केवळ ८ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. मागणी आणि पुरवठा मर्यादित असल्याने येथे दर पूर्णतः स्थिर राहिले. कमीत कमी, जास्तीत जास्त आणि सर्वसाधारण दर प्रत्येकी ४१०० रुपये प्रतिक्विंटल इतके नोंदवले गेले. कमी आवकेमुळे दरात मोठा बदल दिसून आला नाही.

advertisement

कोरेगाव बाजार समितीत मात्र सोयाबीनला चांगला दर मिळाला. येथे १६५ क्विंटल आवक झाली असून, सर्व सोयाबीनची खरेदी ५३२८ रुपये प्रतिक्विंटल या एकाच दराने झाली. कमीत कमी, जास्तीत जास्त आणि सरासरी दर समान राहिल्याने कोरेगाव बाजारात दर स्थिर पण उच्च पातळीवर असल्याचे चित्र आहे. चांगल्या प्रतीच्या मालाला व्यापाऱ्यांकडून मागणी असल्याचे यावरून स्पष्ट होते.

advertisement

विदर्भातील प्रमुख बाजार असलेल्या नागपूर बाजार समितीत सर्वाधिक ७९४ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे लोकल सोयाबीनचे दर ४३५० ते ४८५५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले, तर सर्वसाधारण दर ४७२८ रुपये नोंदवला गेला. मोठ्या आवकेमुळे दरात काही प्रमाणात फरक दिसून आला, मात्र सरासरी दर समाधानकारक असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

advertisement

हिंगोली बाजार समितीतही मोठी आवक नोंदवली गेली. येथे ८०० क्विंटल लोकल सोयाबीन बाजारात दाखल झाले. दर ४२५० ते ४७५० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले, तर सरासरी दर ४५०० रुपये इतका होता. आवक जास्त असूनही दर मोठ्या प्रमाणात घसरले नसल्याने बाजार स्थिर असल्याचे संकेत मिळत आहेत.

मराठवाड्यातील परतूर बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची २१ क्विंटल इतकी मर्यादित आवक झाली. येथे दर ४१५० ते ४८२५ रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले, तर सर्वसाधारण दर ४८१० रुपये नोंदवण्यात आला. कमी आवक आणि चांगल्या प्रतीमुळे येथे दर तुलनेने जास्त राहिले.

मुरुम बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनची १६३ क्विंटल आवक झाली. येथे दर ४००० ते ४७२१ रुपये प्रतिक्विंटल इतके होते, तर सरासरी दर ४४६२ रुपये नोंदवला गेला. आवक मध्यम असल्याने दरांमध्ये चढ-उतार दिसून आला.

बार्शीटाकळी बाजार समितीत ५५४ क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. येथे दर ४००० ते ४४०० रुपये प्रतिक्विंटल दरम्यान राहिले, तर सर्वसाधारण दर ४२०० रुपये होता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, तुरीचे वाढले भाव, सोयाबीनची काय स्थिती? Video
सर्व पहा

मराठी बातम्या/कृषी/
नवीन वर्षाच्या तिसऱ्याच दिवशी सोयाबीन बाजारात मोठी उलथापालथ! दर कडाडले, आजचे भाव काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल