TRENDING:

कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, तुरीचे वाढले भाव, सोयाबीनची काय स्थिती? Video

Last Updated:

3 जानेवारी शनिवार रोजी राज्यातील कृषी बाजारात विविध पिकांच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. काही पिकांच्या दरात घसरण दिसून आली, तर काही ठिकाणी दर स्थिर किंवा किंचित वाढलेले दिसले. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अमरावती : 3 जानेवारी शनिवार रोजी राज्यातील कृषी बाजारात विविध पिकांच्या दरांमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. काही पिकांच्या दरात घसरण दिसून आली, तर काही ठिकाणी दर स्थिर किंवा किंचित वाढलेले दिसले. कांद्याच्या दरात घसरण नोंदवली गेली असून सोयाबीनचे सर्वाधिक दर स्थिर राहिले आहेत. दुसरीकडे तुरीच्या दरात मात्र थोडी वाढ दिसून येत आहे. राज्यातील प्रमुख बाजारांतील आजची आवक आणि दरांचा आढावा घेऊयात.
advertisement

कपाशीचे सर्वाधिक दर स्थिर इतर दरात घसरण

कृषी मार्केट वेबसाईटवरील सायंकाळी 6.30 वाजताच्या रिपोर्टनुसार, आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 14 हजार 755 क्विंटल कपाशीची आवक झाली. सर्वाधिक आवक ही वर्धा मार्केटमध्ये झाली. वर्धा मार्केटमध्ये आवक झालेल्या 5 हजार क्विंटल कपाशीला कमीतकमी 7200 ते जास्तीत जास्त 7985 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. जालना आणि अकोला या मार्केटमध्ये कपाशीला 8010 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजारभाव मिळाला. शुक्रवारी मिळालेला सर्वाधिक दर आजही स्थिर आहे. मात्र, इतर दरात घट झालेली दिसून येत आहे.

advertisement

रिक्षाचालक पतीचं निधन, ‘ती’ खचली नाही, निर्णय घेतला, मुंबईच्या ‘सावित्री’ची संघर्षगाथा!

कांद्याच्या दरात घसरण

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये 1 लाख 82 हजार 681 क्विंटल कांद्याची आवक झाली. यातील सोलापूर मार्केटमध्ये 76 हजार 217 क्विंटल लाल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी कांद्याला कमीतकमी 100 ते जास्तीत जास्त 2500 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजार भाव मिळाला. शुक्रवारी मिळालेल्या सर्वाधिक दराच्या तुलनेत आज कांद्याच्या दरात घट झालेली दिसून येत आहे.

advertisement

सोयाबीनचे सर्वाधिक दर स्थिर

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 33 हजार 896 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. यातील लातूर मार्केटमध्ये 9 हजार 805 क्विंटल सोयाबीनची सर्वाधिक आवक झाली. त्याठिकाणी सोयाबीनला कमीतकमी 4353 ते जास्तीत जास्त 4893 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच सातारा मार्केटमध्ये सोयाबीनला 5328 रुपये प्रतिक्विंटल सर्वाधिक बाजारभाव मिळाला. सोयाबीनला शुक्रवारी मिळालेला सर्वाधिक दर आज स्थिर आहे.

advertisement

तुरीच्या दरात किंचित वाढ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी, केळी आणि द्राक्षाला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

आज राज्यातील कृषी मार्केटमध्ये एकूण 12 हजार 627 क्विंटल तुरीची आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये 5 हजार 025 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक नोंदवण्यात आली. त्याठिकाणी पांढऱ्या तुरीला 5350 ते 7040 रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळाला. तसेच जालना मार्केटमध्ये आलेल्या 75 क्विंटल काळ्या तुरीला 8500 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वाधिक बाजार भाव मिळाला. शुक्रवारी मिळालेल्या दराच्या तुलनेत आज किंचित वाढ बघायला मिळत आहे.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, तुरीचे वाढले भाव, सोयाबीनची काय स्थिती? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल