TRENDING:

मार्चच्या अखेरीस सोयाबीनच्या दरात मोठी उलथपालथ! एप्रिलमध्ये दर कडाडणार? नवीन अपडेट आली समोर

Last Updated:

Soyabean Market Update : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरू असून, काही ठिकाणी दरात स्थिरता तर काही ठिकाणी दरात वाढ दिसून येत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरू असून, काही ठिकाणी दरात स्थिरता तर काही ठिकाणी दरात वाढ दिसून येत आहे. २९ आणि ३० मार्च २०२६ रोजीच्या बाजारभावानुसार शेतकऱ्यांना सरासरी चांगला दर मिळत असल्याचे चित्र आहे.
Soyabean market Update
Soyabean market Update
advertisement

काही बाजारात दरात वाढ, काही ठिकाणी स्थिरता

३० मार्च रोजी नागपूर बाजार समितीत ११० क्विंटल सोयाबीनची आवक झाली. येथे किमान दर ४८०० रुपये, कमाल दर ५५०० रुपये तर सरासरी दर ५३२५ रुपये प्रति क्विंटल नोंदवला गेला. वरूड बाजारात पिवळ्या सोयाबीनसाठी ५०३० ते ५३६० रुपये दर मिळाला असून सरासरी दर ५३६० रुपये राहिला.

advertisement

बुलढाणा-धड बाजारात २९५ क्विंटल आवक झाली. येथे दर ४८०० ते ५३२५ रुपयांच्या दरम्यान राहिले असून सरासरी ५१०० रुपये मिळाले. काटोल बाजारात मात्र दरात वाढ दिसून आली. येथे ५३२९ ते ५६०१ रुपये दर मिळत असून सरासरी ५४५० रुपये दर नोंदवण्यात आला.

२९ मार्चला दरात मिश्र चित्र

२९ मार्च रोजी सिल्लोड बाजारात ५३०० रुपये स्थिर दर मिळाला. राहुरी बाजारात ५२०० रुपये दर नोंदवला गेला. पैठण बाजारात मात्र दर कमी असून ४२०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला.

advertisement

निलंगा बाजारात १७५ क्विंटल आवक झाली असून येथे ५३५० ते ५५७० रुपये दर मिळाले, तर सरासरी दर ५४०० रुपये राहिला. भिवापूर बाजारात दरात मोठी तफावत दिसून आली. येथे किमान दर ३५०० रुपये तर कमाल दर ५४५० रुपये इतका होता.

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक स्थिती

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेती करावी तर अशी, पारंपरिक पद्धतीला फाटा देत केली हुरडा ज्वारी लागवड, आता लाखांत कमाई
सर्व पहा

एकूणच, राज्यातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला 5000 रुपयांपेक्षा जास्त दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. विशेषतः काटोल, निलंगा आणि वरूड बाजारात चांगले दर मिळत असल्याचे दिसून येते.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
मार्चच्या अखेरीस सोयाबीनच्या दरात मोठी उलथपालथ! एप्रिलमध्ये दर कडाडणार? नवीन अपडेट आली समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल