माढा तालुक्यातील चिंचोलीचे शेतकरी हणमंतू लोंढे हे गेल्या 15 वर्षांपासून पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. पारंपारिक शेती करताना म्हणावे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे लोंढे यांनी थोडासा अभ्यास करून शेवगा लागवड करण्याचा निर्णय घेतला. परंतु, ही शेती फक्त शेंगांपुरतीच मर्यादित न ठेवता शेवग्याच्या पानांची पावडर देखील करून विकण्याचा निर्णय घेतला.
advertisement
दीड एकरात शेवगा
लोंढे यांनी दीड एकर शेतीत देशी शेवग्याची लागवड केली. शेवग्याची पाने कापून त्यानंतर किडकी आणि पिवळी पाने वगेळी केली जातात. गरम पाणी, मिठाच्या पाण्यात व्यवस्थित स्वच्छ केले जाते. शेवग्याची पाने निर्जंतुक करून वाळवली जातात. त्यानंतर त्या पानापासून पावडर बनवली जाते. एकदा शेवग्याच्या पानापासून पावडर बनवली तर ती 3 वर्षापर्यंत खराब होत नाही. तर लागवड केलेली शेवगा प्लॉट हा कमीत कमी 6 ते 7 वर्ष चालतो, असे लोंढे सांगतात.
कंपनीची नोंदणी
हनुमंत लोंढे यांनी शिवांजली फॉर्म ॲन्ड हर्बल या नावाने फर्म नोंदणी केली आहे. शेवग्याच्या पाल्यापासून बनवलेला पावडर गुडघेदुखी, कंबर दुखी, शुगर कमी करणे, ब्लड प्रेशर नियंत्रण करणे, थायरॉईड, सांधेदुखी सह 300 आजारावर शेवगा पावडर औषधी म्हणून गुणकारी आहे. हनुमंत लोंढे यांच्याकडे फायटर मोरिंगा पावडर 50 ग्रॅम पासून ते 1 किलो पर्यंत मिळत मिळत आहे.
लाखोंची कमाई
सध्या सोलापूर जिल्ह्यासह, पुणे, मुंबई, धाराशिव, सांगली, तसेच कर्नाटक, बेंगलोर, हैदराबाद या ठिकाणी कुरिअरद्वारे ग्राहकापर्यंत पावडरची घरपोच विक्री केली जाते. शेवग्याच्या पानापासून बनवलेल्या पावडर विक्रीतून हनुमंत लोंढे यांनी सर्व खर्च वजा करून दीड वर्षात दोन लाखांपर्यंत उत्पन्न घेतला आहे.