वाफळे येथील प्रगतशील शेतकरी दिगंबर चव्हाण यांनी आपल्या अर्धा एकर शेतात उमरान आणि चमेली बोरांची लागवड केली होती. या बोरांच्या विक्रीतून खर्चही निघेना. त्यामुळे त्यांनी डोकं चालवलं आणि इतरांप्रमाणे बाग काढून टाकण्याऐवजी त्याच झाडांना चेकनेट बोरांचं कलम केलं. आता गेल्या चार वर्षांत त्यांना 16 लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं आहे.
Farmer Success Story: पारंपरिक शेतीला दिला फाटा, 26 गुंठ्यात मिळाला 60 हजार नफा
advertisement
कशी केलीये लागवड?
अर्ध्या एकरात जवळपास 60 चेकनेट बोरांची लागवड केली आहे. यात 18 बाय 18 वर अंतर ठेवून लागवड केली आहे. चेकनेट बोरांची लागवड करण्यापासून ते फवारणीपर्यंत अर्ध्या एकराला 40 ते 45 हजार रुपयांपर्यंत खर्च आला. तर चार वर्षांत 1 लाख 80 हजार रुपये बोरांच्या बागेवर खर्च झाले आहेत, असे चव्हाण सांगतात.
चेकनेट बोरांना मोठी मागणी
चेकनेट बोर दिसायला नारंगी पिवळसर रंगाची असतात आणि खाण्यासाठी स्वादिष्ट गोड आणि लहान आकाराची असतात. सोलापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, धाराशिव, कोल्हापूर, या ठिकाणी चेकनेट बोरांना मागणी अधिक आहे. एकदा लागवड केल्यानंतर या बोरापासून शेतकरी दिगंबर चव्हाण हे गेल्या चार वर्षांपासून उत्पन्न घेत आहेत. या काळात 1 लाख 80 हजारांचा खर्च आला असून 16 लाख रुपयांचं उत्पन्न निघालं आहे, असं शेतकरी सांगतात.
दरम्यान, शेतकऱ्यांनी ऊस किंवा पारंपरिक पिके घेण्यापेक्षा वेगळे प्रयोग करणं गरजेचं आहे. चेकनेट बोरांची शेती केली तर कमी खर्चात जास्त नफा मिळेल, असं मत शेतकरी दिगंबर चव्हाण सांगतात.





