हराळवाडी येथील शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी एप्रिल 2025 मध्ये आपल्या 20 गुंठे शेतात टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोची लागवड करत असताना गावातील काही शेतकरी व मित्रांनी टोमॅटोच्या ऐवजी दुसरं पीक करण्याचा सल्ला दिला. आता पीक लावल्यास दर मिळणार नाही आणि मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागेल, असं त्यांचं मत होतं. पण ज्ञानेश्वर यांनी कुणाचंही न ऐकता टोमॅटो शेती करण्याचा निर्णय घेतला, असं ते सांगतात.
advertisement
3 लाखांहून अधिक उत्पन्न
ज्ञानेश्वर यांनी 20 गुंठ्यात 40 ते 45 हजार रुपये खर्च करून टोमॅटोची लागवड केली. टोमॅटोचे योग्यरित्या व्यवस्थापन करून आतापर्यंत 350 कॅरेट मालाची विक्री केली. तर यातून सर्व खर्च वजा करून 2 लाख 70 हजार रुपयांचा नफा त्यांना मिळाला आहे. अजूनही 100 कॅरेट पर्यंत टोमॅटो शेतातून निघणार असून आणखीन 60 ते 70 हजार रुपयांचा नफा मिळणार असल्याची माहिती शेतकरी ज्ञानेश्वर यांनी दिली.
कशी केली टोमॅटो शेती?
20 गुंठ्यात टोमॅटोची लागवड करताना ज्ञानेश्वर यांनी मल्चिंग टाकून टोमॅटोची लागवड केली आहे. सध्या बाजारात टोमॅटोला 30 ते 40 रुपये किलो दर मिळत आहे. तर एक कॅरेट हजार रुपये ते 1200 रुपये किलोने विक्री होत आहे. तर ज्ञानेश्वर हे तालुक्यातील आठवडी बाजारात स्वतः टोमॅटोची विक्री करतात. त्यामुळे त्यांना टोमॅटो शेतीतून अधिक नफा मिळत आहे.
दरम्यान, शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने टोमॅटो पिकाचे व्यवस्थापन केल्यास भरघोस उत्पन्न मिळेल, असा सल्ला शेतकरी ज्ञानेश्वर हिप्परकर यांनी दिला आहे.





