TRENDING:

ऊसतोड मजुराने सुरु केला पोल्ट्री फार्म व्यवसाय, 45 दिवसाला 70 हजारांची कमाई

Last Updated:

पोल्ट्री फार्म हा व्यवसाय करत भरपूर लोकांनी स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवल्याचे दिसून येत आहे. बीडमधील सय्यद सहमद यांची अशीच कहाणी असून ते पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या माध्यमातून बक्कळ कमाई करत आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रशांत पवार, प्रतिनिधी
advertisement

बीड : दिवसेंदिवस पोल्ट्री फार्म या व्यवसायाचा प्रसार शेतकऱ्यांमध्ये चांगलाच वाढत आहे. खर तर हा व्यवसाय अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये तुम्ही सुरू करू शकता. पोल्ट्री फार्म हा व्यवसाय करत भरपूर लोकांनी स्वतःला आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवल्याचे दिसून येत आहे. बीडमधील सय्यद सहमद यांची अशीच कहाणी असून ते पोल्ट्री फार्म व्यवसायाच्या माध्यमातून बक्कळ कमाई करत आहेत.

advertisement

बीड जिल्ह्यातील नित्रुड गावचे सय्यद सहमद हे आधी ऊसतोड कामगार म्हणून काम करत असतं. त्या माध्यमातून त्यांना आर्थिक दृष्ट्या काही लाभ होत नसल्याने ते निराशा जनक परिस्थितीत अडकलेले होते. स्वतःचा काहीतरी व्यवसाय करता यावा म्हणून त्यांनी अनेक प्रयत्न केले परंतु त्यांच्या प्रयत्नांना मात्र अपयश आलं. काही दिवसानंतर पोल्ट्री फार्म या व्यवसायाबद्दल त्यांना माहिती मिळाली आणि त्यांनी 500 पक्षी असणाऱ्या कोंबड्यांचा एक शेड तयार केला.

advertisement

मोसंबी शेतीतून होईल बक्कळ कमाई, पण मृग बहरात या तारखेनंतरच करा विक्री

खरंतर हा शेड वैयक्तिक किरकोळ विक्रीसाठी ते चालवू लागले. परंतु या माध्यमातून त्यांना फारसं काही मिळालं नाही. म्हणून त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न केला. मात्र इथून पुढे त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार होतं. पोल्ट्री फार्म शेड उभारण्यासाठी त्यांना 10 लाख रुपये सुरुवातीला खर्च आला. यासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. परंतु इथूनच त्यांच्या व्यवसायाला एक वेगळी दिशा मिळाली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दिवाळीत फुलांना सोन्याचं मोलं, शेवंती, झेंडू खायोत भाव, गुलाबाचा दर काय?
सर्व पहा

त्यांच्या कमाई बद्दल बोलायचं झालं तर या व्यवसायाच्या माध्यमातून ते चांगली कमाई करत असून ठोक विक्रीच्या माध्यमातून ते 60 ते 70 हजार रुपये प्रत्येक 45 दिवसाला मिळवतात. शेडमध्ये 4000 एवढी पक्षांची संख्या आहे. खरतर हा व्यवसाय करण्यामागचा  त्यांचा एकच उद्देश आहे की त्यांना जमिनीचा क्षेत्र कमी प्रमाणात आहे.

मराठी बातम्या/कृषी/
ऊसतोड मजुराने सुरु केला पोल्ट्री फार्म व्यवसाय, 45 दिवसाला 70 हजारांची कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल