3 बुलेट अन् चौदा दुचाकी
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील करोडी येथील मनोहर चव्हाण यांच्याकडे हा लखन नावाचा बैल आहे. कर्नाटकातील मैसूर जातीचा ‘लखन’ सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरतोय. चार वर्षांचा लखन मनोहर यांनी दोन वर्षांपूर्वी साडेबारा लाखांना विकत घेतला होता. या दोन वर्षांत त्याने आपल्या मालकाला तब्बल 70 लाखांची कमाई करून दिली आहे. विविध शर्यतीत भाग घेऊन त्याने तीन बुलेट आणि चौदा दुचाकी जिंकल्या आहेत.
advertisement
दोन्ही डोळ्यांनी अंध बैल अन् शेतकऱ्याची अनोखी दोस्ती, Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!
लखनचा आहार कसा
लखनच्या आहारात कोरडा चारा, मका, रोज 10 लिटर दूध, 10 अंडी आणि दीड किलो काजू-बदाम असं पौष्टिक खाद्य दिलं जातं. हाच त्याच्या ताकदीचा आणि वेगाचा मुख्य आधार मानला जातो. फलटणसारख्या मोठ्या शर्यतीत लखनने 5 लाखांचं बक्षीस पटकावलं आहे. त्याचा स्वभाव शांत आहे, मात्र शर्यतीत उतरल्यावर त्याचा वेग पाहून प्रेक्षक थक्क होतात.
85 लाखांची मागणी पण...
मालक मनोहर चव्हाण यांनी लखनला शिकवण्यासाठी तब्बल 25 एकर जमीन पडीत ठेवली आहे. एवढी मेहनत आणि काळजी घेतल्यामुळेच लखन आज प्रत्येक स्पर्धेत झेंडा फडकवतो आहे. दोन वर्षांपूर्वी लखनसाठी तब्बल 85 लाखांची मागणी आली होती. मात्र मालकाने विकण्यास नकार दिला. आज शर्यतीत लखन हे नाव ताकद, वेग आणि विजयाचं प्रतीक ठरलं आहे.





