योगेश घावटे हे मोसंबी शेती करत असून त्यांनी 5 एकर मध्ये 750 मोसंबीच्या झाडांची लागवड केलेली आहे. गतवर्षी देखील साडेतीन ते चार लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यांनी पाच टन मोसंबी विकली आहे. त्यातून दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले, तर उर्वरित मोसंबीतून आणखी 2 लाखांहून अधिक उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे.
advertisement
Agriculture: आता गावची माती गावातच तपासा, सरकार देणार 150000 रुपयांचं अनुदान, कसा करायचा अर्ज?
एक एकरापासून सुरुवात
सटाणा येथे घावटे यांनी सर्वप्रथम 2005 साली 1 एकर मध्ये 200 मोसंबी झाडांची 15 बाय 15 अशी लागवड केली होती. या मोसंबी लागवडीतून चांगले उत्पन्न मिळाले. त्यानंतर 2012 मध्ये देखील 3 एकर मध्ये लागवड केली. अशी एकूण साडेपाच एकर मध्ये मोसंबीची लागवड आहे. जवळपास गेल्या 20 वर्षांपासून मोसंबी शेती करत असल्यामुळे चांगला अनुभव आला. अनुभवामुळे मोसंबी शेतीतून चांगले उत्पन्न मिळू लागले, असे घावटे यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले.
कुटुंबाची साथ
योगेश यांच्या बरोबर त्यांचे भाऊ राम घावटे हे देखील मोसंबी शेतीसाठी त्यांना मदत करतात. लागवड चांगल्या प्रकारे केलेली आहे. तसेच झाडांची देखभाल देखील चांगल्या पद्धतीने केली जाते. मात्र बाजारभावावर देखील उत्पन्नाचे सर्व काही अवलंबून आहे. निसर्गाने चांगली साथ दिली तर मोसंबीच्या उत्पन्नाला तोड नाही. मोसंबीसाठी शेणखताचा वापर करण्यात येतो. तसेच खताचा वापर करून पाणी देखील देण्यात येते. यंदा पाऊस चांगला असल्यामुळे फळ चांगले पोसलेले असल्याचे घावटे यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना सल्ला
आतापर्यंत 5 टनापर्यंत मोसंबी विकल्या गेली आहे. आणखी 10 टन मोसंबी झाडांना आहे, त्याची काढणी झाल्यानंतर विकल्या जाईल आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळेल. सध्या सर्व शेतकरी 10 ते 12 फुटावर झाडांची लागवड करत आहे. मात्र, नवीन शेतकऱ्यांनी मोसंबी शेती करायची असल्यास 15 फुटावर मोसंबीची लागवड करावी. त्यामुळे फळ चांगलं येतं आणि नफाही चांगला मिळतो, असे शेतकरी सांगतात.





