हराळवाडी गावातील शेतकरी चंद्रकांत ढगे हे गेल्या 15 वर्षांपासून डाळिंबाची बाग करत आहेत. एका एकरात चंद्रकांत यांनी डाळिंबाची लागवड केली आहे. गेल्यावर्षी एक एकरातून 20 ते 22 लाखांचे उत्पन्न सर्व खर्च वजा करून मिळाले होते. या वर्षी फवारणी, खते इत्यादी मिळून 5 ते 6 लाख रुपये खर्च चंद्रकांत ढगे यांनी केला होता. परंतु या अवकाळी पावसामुळे चंद्रकांत यांना 20 ते 25 लाखांचा नुकसान झालं आहे.
advertisement
चंद्रकांत ढगे यांच्या डाळिंबाला उत्कृष्ट कॉलेजचे डाळिंब लागले होते. परंतु मे महिन्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे डाळिंबाचे झाड फळ तुटून पडले आहे. तर या अवकाळी पावसामुळे डाळिंब बागेत तेल्या, करपा, तसेच बुरशीजन्य रोगाचे प्रमाण हे वाढत आहे. डाळिंबच्या बागेला या रोगापासून वाचवण्यासाठी महागड्या औषधांची फवारणी देखील करावी लागत आहे.
आधीच बाजारात शेतमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर दुसरीकडे सूर्य असलेल्या अवकाळी पावसामुळे फळबागेचे तसेच पालेभाज्या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी चंद्रकांत ढगे यांनी केली आहे.