अल्पभूधारक शेतकरी हनुमंत देशमुख हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून घेवड्याची लागवड करत आहेत. 4 एप्रिल रोजी घेवड्याची लागवड केली होती. एकदा घेवड्याची लागवड केल्यावर सहा महिन्यांपर्यंत त्याची तोडणी सुरू असते. घेवड्याची लागवड करण्याअगोदर जमिनीची मशागत करून शेणखत, भेसळ डोस भरून अडीच फुटावर घेवड्याच्या बियांची लागवड केली. दोघांमध्ये अंतर सात फुटाचे ठेवले आहे, तर तीन फुटावर एक बी लावलेली आहे.
advertisement
प्रामुख्याने घेवड्यावर अळी आणि नागअळी, दावण्या या रोगांचा प्रादुर्भाव होतो. हा रोग होऊ नये म्हणून शेतकरी हनुमंत देशमुख यांनी वेळोवेळी फवारणी केली. आतापर्यंत देशमुख यांना दहा गुंठ्यातून 80 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शेतामध्ये अजूनही तीन महिने घेवडा तोडणी सुरू असणार असून सर्व खर्च वजा करून शेतकरी हनुमंत देशमुख यांना एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळणार असल्याची माहिती दिली.
काही दिवसांपूर्वी घेवड्याला मागणी 700 रुपये 10 किलोप्रमाणे दर मिळत होता. आता बाजारामध्ये सर्व जिल्ह्यांतून घेवड्याची विक्री होत असून 300 रुपये दहा किलोप्रमाणे दर मिळत आहे. अल्पभूधारक शेतकरी जर असाल, तर त्या शेतकऱ्यांनी नक्कीच घेवड्याची लागवड करावी आणि कमी खर्चातून अधिकाधिक उत्पन्न घ्यावे. फक्त घेवड्याची काळजी आणि त्याचे व्यवस्थापन योग्यरीत्या केल्यास नक्कीच भरघोस उत्पन्न मिळेल, असा सल्ला शेतकरी हनुमंत देशमुख यांनी दिला आहे.





