TRENDING:

शेतकऱ्याची भरारी, 2 एकरमध्ये मिळाले 100 टन केळीचे उत्पादन, कशी साधली किमया?

Last Updated:

जरुड येथील नितीन देशमुख हे शेतकरी गेल्या 20 वर्षापासून केळीची शेती करत आहेत. नवनवीन तंत्राचा वापर करून भरघोस उत्पन्न कसे मिळेल याकडे त्यांचा जास्त कल असतो. यावर्षी त्यांनी केलेल्या मेहनती मधून त्यांना चांगले उत्पादन झाले आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरूपी, प्रतिनिधी 
advertisement

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील मोर्शी आणि वरूड तालुका हा संत्रा पिकासाठी प्रसिद्ध असलेला तालुका आहे. आता त्यात नवनवीन पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढीस लागली आहे. जरुड येथील नितीन देशमुख हे शेतकरी गेल्या 20 वर्षापासून केळीची शेती करत आहेत. नवनवीन तंत्राचा वापर करून भरघोस उत्पन्न कसे मिळेल याकडे त्यांचा जास्त कल असतो. यावर्षी त्यांनी केलेल्या मेहनती मधून त्यांना चांगले उत्पादन झाले आहे. 2 एकर केळीच्या बागेत त्यांना 100 टनाचे उत्पादन झाले आहे.

advertisement

जरूड येथील केळी उत्पादक शेतकरी नितीन देशमुख यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, माझ्याकडे वडिलोपार्जित 35 एकर शेती आहे. आम्ही तीन भावंडं आहोत, पण शेती मी बघतो. परंपरागत पद्धतीने शेती केली असता ती परवडत नाही. मग त्यात काय नवीन करायचं? म्हणून आम्ही 20 वर्षाआधी संत्राचे काही झाडं लावली. त्याचबरोबर केळीची सुद्धा लागवड केली. 2 एकरमध्ये केळीची लागवड केली असता उत्पन्न काही खर्चाला जुळत नव्हतं. आधी केलेली लागवड ही परंपरागत होती. म्हणून मी 2 वर्षांनंतर टिशू कल्चर केळीची लागवड केली. त्यामुळे माझ्या उत्पन्नात वाढ होण्यास सुरुवात झाली.

advertisement

अडीच एकरात लावली द्राक्षे, आता 25 एकराचा मालक, एकरी नफा 10 लाखांचा!

निव्वळ नफा किती? 

माझ्या शेतात ठिंबक सिंचन असल्याने केळी पीक हे कमी पाण्यात चांगले बहरून येते. त्याचबरोबर ते टिशु कल्चर केळीमध्ये जी-9 जातीची केळी लावतात. यामुळे त्यांना एकसारखे उत्पन्न होत आहे. यावर्षी त्यांनी पाहिली कटाई केलेली आहे. तीच झाडं आणखी बहरायला सुरूवात झाली आहे. आधीच्या केळी मध्ये त्यांना 2 एकरमध्ये कमीत कमी 100 टन केळीचे उत्पादन झाले आहे. त्याचबरोबर 10 हजार रुपये प्रति टन असा भाव मिळालाय. त्यामुळे त्यातून 6 ते 6.50 लाख रुपये निव्वळ नफा त्यांना झालेला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर दबावातच, कांदा आणि मक्याची काय स्थिती? चेक करा एका क्लिकवर
सर्व पहा

गावात केळीची लागवड करणारे कमीत कमी शेतकरी 20 वर्षाआधी होते. आता मी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतो. त्यांना केळी शेतीकडे जाण्यास प्रोत्साहित करतो, कारण इतर शेतीत झालेला तोटा केळी भरून काढू शकते. त्यामुळे अनेक शेतकरी आता केळीच्या शेतीकडे वळले आहेत, असेही नितीन देशमुख यांनी सांगितले.

मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्याची भरारी, 2 एकरमध्ये मिळाले 100 टन केळीचे उत्पादन, कशी साधली किमया?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल