अल्पभूधारक शेतकरी विष्णू हराळे यांनी अवघ्या 26 गुंठ्यात मुळ्याची शेती केली आहे. मुळा लागवडी अगोदर शेतामध्ये नागरणी करून त्यामध्ये शेणखत घालून रोटर मारून मुळा बियाण्याची लागवड केली जाते. 26 गुंठ्यात 25 ते 30 हजार मुळा बियांची लागवड केली. 30 हजार बियांमधील 10 हजार बिया जरी आल्या नाही किंवा खराब निघाल्या तरी 20 हजार बिया सरासरी आल्या. मी एका मुळ्याची किंमत तीन ते चार रुपये जरी धरली तर लागवडीचा खर्च वजा करून 60 हजार रुपये उत्पन्न मुळा लागवडीतून आतापर्यंत मिळाले आहे, असं विष्णू हराळे यांनी सांगितलं.
advertisement
Ginger Farming: युवा शेतकऱ्याला सापडला पैशाचा फॉर्म्युला, दीड एकरात केली अद्रक शेती, पाहा कमाई किती?
मुळ्याची लागवड केल्यावर 40 ते 35 दिवसानंतर बाजारात विक्रीसाठी तयार होतो. विष्णू हराळे हे मुळ्याची विक्री स्वतः आठवडी बाजारात आणि सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीस विक्रीसाठी पाठवतात. स्वतः मुळा बाजारात विक्री केल्यास अधिक उत्पन्न मिळते, अशी माहिती विष्णू हराळे यांनी दिली.
अजूनही 26 गुंठ्यात मुळा असून त्याची काढणी केल्यास चार ते पाच हजाराचा उत्पन्न मिळणार आहे. म्हणजेच 40 दिवसांत 26 गुंठ्यातून अल्पभूधारक शेतकरी विष्णू हराळे यांना 65 हजाराचा नफा मिळणार आहे. पारंपरिक शेती न करता आधुनिक शेती आणि विविध पिकांची लागवड करून शेतकऱ्यांनी शेती फायदेशीर ठरणार असा सल्ला शेतकरी विष्णू हराळे यांनी दिला आहे.





